Join us  

बहुप्रतिक्षित ‘खुदा हाफिज’चा ट्रेलर OUT, या कलाकरांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 6:15 PM

डिस्ने + हॉटस्टार मल्टिप्लेक्स अंतर्गत प्रदर्शित होणाºया अनेक चित्रपटांपैकी खुदा हाफिज हा तिसरा चित्रपट आहे.

बहुप्रतिक्षेनंतर डिस्ने + हॉटस्टारने आज बॉलिवूड चित्रपट खुदा हाफिजचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला. वास्तविक जीवनातील इव्हेंट्सद्वारे प्रेरित रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर अशा या चित्रपटाचे दिग्दर्शन फारुक कबीर यांनी केले आहे आणि यात विद्युत जामवालसह शिवालीका ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. उझबेकिस्तानच्या नयनरम्य लोकॅल्समध्ये आणि लखनौच्या बाय-लेनमध्ये चित्रित केलेला हा चित्रपट रोमान्स आणि अ‍ॅक्शनपॅक थ्रिलमध्ये उत्तम प्रकारे संतुलित आहे.

 

खुदा हाफिज ही एक तरुण जोडप्याची समीर (विद्युत जामवाल) आणि नर्गिस (शिवालिका ओबेरॉय) कहाणी आहे ज्यांनी अलीकडेच भारतात लग्न केले आहे आणि ते करियरच्या अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी परदेशात जाण्याचे ठरवतात. रहस्यमय आणि धक्कादायक परिस्थितीत नर्गिस परदेशात बेपत्ता झाली आणि समीर, एक असहाय्य आपल्या पत्नीला सुरक्षितपणे आपल्याबरोबर परत आणण्यासाठी सर्वकाही करण्याचा प्रयत्न करतो.

अ‍ॅक्शन सिनेमांमधील पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेले विद्युत जामवाल नव्या रोमँटिक अवतारात दिसणार आहेत. तो याबाबत म्हणाला, ‘खुदा हाफिज हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे कारण माझे पात्र समीर असे आहे आणि मी यापूर्वी असा रोल केलेला नाही. चित्रपट उत्कृष्ट कलाकारांसह रोमांस, अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे. दिग्दर्शक-लेखक फारूक कबीर अत्यंत हुशार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला आनंद झाला. मला आनंद आहे की हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी सारख्या प्लेटफॉमवर प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे यांवर रिलीज झाल्यावर देशभरातील लोक त्याचा आनंद घेण्यास सक्षम असतील.

ट्रेलर रिलीजच्या उत्साहात दिग्दर्शक-लेखक फारूक कबीर यांनी सांगितले की, ‘खुदा हाफिज हा चित्रपट जेव्हा मी दिग्दर्शित करण्यासाठी घेतला तेव्हापासून आतापर्यंत या प्रेमकथेला भावनिक आणि शिवाय त्यात थ्रिलही असायला हवे, असे ठरवले होते. यात सर्व वास्तविक भूमिका, मला वास्तविक वाटणाºया एका वास्तविक जीवनातील वास्तविक कथा म्हणजे एक अनोखी स्टोरी पाहण्याचा अनुभव असेल.’ पॅनोरामा स्टुडिओ इंटरनॅशनलचे निर्माता अभिषेक पाठक पुढे म्हणाले, ‘खुदा हाफिज माझा आणि संपूर्ण संघाचा अगदी जवळचा आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येईल आणि मी त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. फारुकची दूरदृष्टी, वास्तववादी कृती आणि संपूर्ण कलाकारांनी केलेली अप्रतिम कामगिरी प्रेक्षकांना शेवटपर्यंत अडकवून ठेवेल.

डिस्ने + हॉटस्टार मल्टिप्लेक्स अंतर्गत प्रदर्शित होणाºया अनेक चित्रपटांपैकी खुदा हाफिज हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल, शिलीका ओबेरॉय, अन्नू कपूर, आहाना कुमरा आणि शिव पंडित आहेत. याचे लेखन व दिग्दर्शन फारूक कबीर यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक (पॅनोरामा स्टुडिओ इंटरनेशनल) आणि झी म्युझिकवरील मिथून यांनी केले आहे. खुदा हाफिज १४ आॅगस्ट २०२० रोजी फक्त डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :विद्युत जामवाल