Join us  

KGF 2 on OTT: लवकरच मोबाइलवर बघू शकणार KGF 2, जाणून घ्या कुठे आणि कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:14 AM

KGF 2 on OTT : शहरी भागातील लोक तर थिएटरला जाऊन सिनेमा बघत आहेत, पण ग्रामीण भागातील लोक हा सिनेमा OTT वर बघण्यासाठी उत्सुक आहेत. अशात आता तुम्ही हा सिनेमा OTT वर बघू शकणार आहात.

KGF 2 on OTT : साऊथचा सुपरस्टार यशचा (Yash) सिनेमा KGF 2 ला रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आणि सिनेमा अजूनही अनेक ठिकणी हाऊसफुल जात आहे. जगभरातून या सिनेमाचं कौतुक केलं जात आहे. बॉक्स ऑफिसवर केजीएफ २ समोर इतर कोणतेही सिनेमे टिकू शकत नाहीये. या वीकेंडला सिनेमा १००० चा आकडा पार करणार अशी अपेक्षा केली जात आहे. शहरी भागातील लोक तर थिएटरला जाऊन सिनेमा बघत आहेत, पण ग्रामीण भागातील लोक हा सिनेमा OTT वर बघण्यासाठी उत्सुक आहेत. अशात आता तुम्ही हा सिनेमा OTT वर बघू शकणार आहात.

कुठे आणि कधी ऑनलाईन बघायला मिळणार KGF 2 ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon Prime Video ने केजीएफ २ चे डिजिटल स्ट्रीमिंगचे राइट्स मिळवले आहेत. १४ एप्रिलला रिलीज झालेला हा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, कन्नडा, तमिळ आणि मल्याळम भाषेत बघता येणार आहे. २७ मे रोजी हा सिनेमा Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. त्यानंतर तुम्ही आरामात घरी बसून मोबाइल किंवा लॅपटॉपवर हा सिनेमा बघू शकणार आहात.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी तयार केलेल्या या सिनेमाचं बजेट ८० ते १०० कोटी रूपये असल्याचं बोललं जात आहे. आता सिनेमा कमाईच्या बाबतीत अनेक गाजलेल्या सिनेमांचं रेकॉर्ड तोडताना दिसत आहे. सिनेमा कमाईचे रेकॉर्ड तोडून नवा इतिहास रचत आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशीच ६४ कोटी रूपयांपेक्षा जास्तची कमाई केली. कर्नाटकात सिनेमाने २८ कोटी रूपयांची कमाई केली होती. अशाप्रकारे या सिनेमाने आतापर्यंत एकूण ७०० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे.

KGF 3 येणार?

KGF 2 हा २०१८ साली आलेल्या KGF 1 चा सीक्वल आहे. ज्यात यश आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. तर संजय दत्त आणि रवीना टंडन सपोर्टिंग भूमिकेत आहेत. या दोघांच्याही कामाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. संजय दत्तने यात अधिराची अफलातून भूमिका साकारली आहे. KGF 2 नंतर आता KGF 3 येणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. तेच दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाला की, जर प्रेक्षकांना KGF 2 आवडला तर तो फ्रॅंचायजी कायम ठेवण्याचा विचार करू शकतो. 

टॅग्स :केजीएफबॉलिवूड