Join us  

'KGF 2'ने अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये तोडले 'RRR'चे रेकॉर्ड, इतक्या किमतीला विकली जाताहेत 'रॉकी भाई'ची तिकिटं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:36 PM

साउथचा स्टार यश(Yash)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'KGF 2' १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगला सुरूवातदेखील झाली आहे.

KGF 2 ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे आणि चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ज्या प्रेक्षकांनी KGF पाहिला आहे ते KGF 2 च्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. KGF Chapter 2 या आठवड्यात रिलीज होत आहे. KGF 2 च्या हिंदी आवृत्तीने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड ब्रेक करत आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोट्यावधीची कमाई केली आहे.

इंडियन बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, केजीएफ २ ची पहिल्या दिवशीच २० कोटींची अ‍ॅडवान्स बुकिंग झाली आहे. चित्रपटाच्या कन्नड आवृत्तीने ४.९० कोटी, हिंदी आवृत्तीने ११.४० कोटी, मल्याळम आवृत्तीने १.९० कोटी, तेलुगू आवृत्तीने ५ लाख, तमिळ आवृत्तीने २ कोटींची कमाई केली आहे. केजीएफ २च्या हिंदी आवृत्तीची RRR शी तुलना केली जात आहे. या चित्रपटाने RRR चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आरआरआरच्या हिंदी आवृत्तीने अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये ५ कोटींचा व्यवसाय केला होता. कन्नड चित्रपट केजीएफ २ ने उत्तर भारतातील सर्व भाषांमध्ये २० कोटींचा व्यवसाय केला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, हिंदी प्रेक्षकांमध्ये केजीएफ २ चित्रपटाची खूप क्रेझ आहे. त्यांनी लिहिले की, "मुंबईच्या काही ठिकाणी तिकिटांचे दर प्रति सीट १४५० ते १५०० रुपये आहेत, दिल्लीत तिकीट १८०० ते २००० रुपयांना विकले जात आहे.  बॉक्स ऑफिसवर वादळ येत आहे,” १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला KGF 2 चित्रपट पहिल्याच दिवशी ३५ कोटींहून अधिकचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :केजीएफआरआरआर सिनेमायश