Join us

​कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बनणार लॅटिन डान्सर, साईन केला पहिला चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:35 IST

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सूक असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, इसाबेलने आपला पहिला ...

कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सूक असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, इसाबेलने आपला पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. आता या डान्स मुव्हीत इसाबेल कुणासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल, हे जाणून घ्यायलाही तुम्ही उत्सूक असाल. पण थांबा...थांबा...कारण तो सलमान खान नाहीये. होय, या चित्रपटात सलमान नाही तर सूरज पांचोलीसोबत इसाबेल रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात दोघेही सालसापासून तर पासो दोबलेपर्यंत  अनेक डान्स फॉर्म्स करताना दिसतील.या चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. या चित्रपटासाठी गेल्या दोन महिन्यांपासून इसाबेल  व सूरज प्रचंड मेहनत घेतायेत. सूरज तर इतका मेहनत घेतोय की, यामुळे त्याला आजारी पडावे लागले. दरदिवशी १० ते १२ तासांचे ट्रेनिंग घेऊन मी आजारी पडलो होतो. पण आता मला याची सवय झालीय. मी माझ्या शाळेत परतलोय, असे मला वाटतेय, असे सूरज याबद्दल म्हणाला.ALSO READ : सलमान खान इन्स्टाग्रामवर कॅटरिना कैफला नव्हे तिच्या बहिणीला करतोय फॉलो!कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे. पुढील महिन्यात ‘टाईम टू डान्स’चे शूटींग सुरू होईल. भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल ५० दिवसांचे आहे. तीन वर्षांपूर्वी सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिला चित्रपट दणकून आपटला . साहजिकचं या चित्रपटाकडून सूरजला मोठ्या अपेक्षा आहेत. इसाबेलचा तर हा पहिलाचं चित्रपट असल्याने ती या प्रोजेक्टबद्दल कमालीची उत्सूक आहे. आता इसाबेल  आणि सूरजला हा चित्रपट किती यश मिळवून देतो, ते बघूच.