कॅटरिना कैफचा राग अनावर, फोटोग्राफरला केले बॅन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 15:48 IST
कॅटरिना कैफ पुन्हा चर्चेत आहे. होय, अलीकडे एका घटनेमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. करण जोहरच्या व्हॅलेन्टाईन डे पार्टीत असे ...
कॅटरिना कैफचा राग अनावर, फोटोग्राफरला केले बॅन!!
कॅटरिना कैफ पुन्हा चर्चेत आहे. होय, अलीकडे एका घटनेमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. करण जोहरच्या व्हॅलेन्टाईन डे पार्टीत असे काही घडले की, कॅटरिनाचा राग अनावर झाला. इतका की, तिने एका फोटोग्राफर्सला चक्क बॅन करून टाकले. आता तुम्हाला प्रकरण सविस्तर कळायला हवेच. तर मग पुढे वाचा...करण जोहरच्या व्हॅलेन्टाईन पार्टीला सगळ्यांप्रमाणेच कॅटरिनाही पोहोचली होती. पार्टी एन्जॉय केल्यानंतर रात्री उशीरा कॅट बाहेर पडली. बाहेर पडली तर मीडियाचे फोटोग्राफर्स साहजिकच तिची प्रतीक्षा करत होते. पण कॅट झटपट बाहेर पडली आणि तडक आपल्या गाडीत बसली. गाडी पुढे जाणार, तोच एका फोटोग्राफरने हद्दच केली. त्याने थेट कॅटची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर थेट कॅटच्या गाडीच्या टपावर चढला आणि तेथून कॅटचे फोटो घेण्याचे प्रयत्न करू लागला. हे पाहून कॅट एकदम अवाक् झाली. यानंतर कॅट शांत बसणे शक्यच नव्हते. तिने लगेच तिच्या टीमला फोन करून हा फोटोग्राफर कोण, याचा शोध घेण्याचे आदेश दिले.या फोटोग्राफरचे नाव कळले. यानंतर कॅटने तिच्या टीमला दुसरा आदेश दिला. तो आदेश म्हणजे, या फोटोग्राफर यानंतर कधीच तिच्या इव्हेंटला इंवाईट केले जाणार नाही. कॅट केवळ इथेच थांबली नाही तर तसे पत्रच तिने संबंधित फोटोग्राफरला पाठवले. आता या बातमीने कॅट पुन्हा चर्चेत येणे साहजिकच होते. तशी ती आलीय. बॉलिवूड कलाकारांना अशा अनेक गैरप्रकारांना सामोरे जावे लागते. कॅटही गेली. पण तिने जी कारवाई केली, ती योग्यच म्हणायला हवी. तुम्हाला काय वाटते?