Join us

​आमिर खानच्या ‘Thugs’ टीममध्ये कॅटरिना कैफची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:30 IST

बॉलिवूडची ब्युटिफुल गर्ल कॅटरिना कैफचे नशीब सध्या जोरावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. मध्यंतरी तिच्या करिअरची नौका पाण्यात चांगलीच ...

बॉलिवूडची ब्युटिफुल गर्ल कॅटरिना कैफचे नशीब सध्या जोरावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. मध्यंतरी तिच्या करिअरची नौका पाण्यात चांगलीच हेलकावे खावू लागली होती. पण आताश: कॅटरिनाची नौका पुन्हा एकदा मार्गी लागल्याचे दिसतेय. सध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात बिझी आहे. म्हणजे बॉलिवूडच्या ‘खान’चा एक सिनेमा कॅटच्या हाती आहे. पण आता याशिवाय बॉलिवूडच्या आणखी  एका ‘खान’सोबत कॅटची वर्णी  लागली आहे. होय, आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिना दिसणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण त्याशिवाय कॅटरिनाही यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.यापूर्वी कॅटरिना व आमिर हे दोघे ‘धूम4’मध्ये एकत्र दिसले होते. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे.  आगामी‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कॅटरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्याTWITTER अकाऊंटवरुन दिलीयं.}}}}‘अखेर आम्हाला आमची शेवटची ‘ठग’ मिळाली. कॅटरिना कैफचे मी स्वागत करतो, असे ट्विट करत आमिरने तिचे ‘ठग्स’च्या टीममध्ये स्वागत केले आहे. आमिर खानसोबत अमिताभ बच्चन यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आता ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिना कोणत्या भूमिकेत दिसणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. अर्थात याबद्दलचे ताजे अपडेट आम्ही तुम्हाला देऊच. पण त्याआधी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिनाला पाहणे तुम्हाला का आवडेल, हे तुम्ही सांगू शकाल. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.