Join us  

कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 5:03 PM

'भारत' सिनेमाच्या यशानंतर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे

ठळक मुद्देसोशल मीडियावर कॅट खूप अ‍ॅक्टिव्ह असते

भारत सिनेमाच्या यशानंतर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. हमको दीवाना कर गए, नमस्ते लंडन, वेलकम, सिंह इज किंग, दे दना दन, तीस मारखां असे अनेक चित्रपट दोघांनी एकत्र  काम केले.  कॅट 16 जुलैला आपला 36वा वाढदिवस साजरा करतेय. कतरिना दरवर्षी बर्थ डेच्या दिवशी सिनेमाचं शूटिंग करते. मात्र यावर्षी तिने एक खास प्लान केला आहे. 

कतरिनाला यावर्षीचा तिचा बर्थडे मित्रांसोबत सेलिब्रेट करण्याची इच्छा आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत कॅट म्हणाली, काही दिवसांचा ब्रेक घेऊन मला बहिणीसोबत आणि मित्रांबरोबर बाहेर जायचे आहे. कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी जाऊन मौज- मस्ती करण्याची इच्छा आहे. सोशल मीडियावर कॅट खूप अ‍ॅक्टिव्ह असते. 

सध्या ती ‘भारत’ सिनेमाच्या यशाची चव चाखत आहे. सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर कमाई करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २५० कोटींचा पल्ला गाठला आहे. भारत अली अब्बास आणि सलमानचा सलग तिसरा हिट सिनेमा आहे. याआधी दोघांनी टायगर जिंदा है, सुल्तान या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, कतरिना आणि अक्षय कुमारच्या जोडीचा ‘सूर्यवंशी’  पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता.

टॅग्स :कतरिना कैफभारत सिनेमा