व्हेल शार्कसोबत पोहताना दिसली कॅटरिना कैफ; विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 17:45 IST
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या सोशल मीडियाची क्वीन बनताना बघावयास मिळत आहे. कारण जेव्हापासून कॅटरिना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली तेव्हापासून ती नियमितपणे स्वत:चे हॉट फोटोज् आणि व्हिडीओ शेअर करताना बघावयास मिळत आहे.
व्हेल शार्कसोबत पोहताना दिसली कॅटरिना कैफ; विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ बघा!
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या सोशल मीडियाची क्वीन बनताना बघावयास मिळत आहे. कारण जेव्हापासून कॅटरिना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली तेव्हापासून ती नियमितपणे स्वत:चे हॉट फोटोज् आणि व्हिडीओ शेअर करताना बघावयास मिळत आहे. आता तर कॅटरिनाने असा काही व्हिडीओ शेअर केला, जो बघून कोणीही दंग होईल. होय, कॅटरिनाने चक्क व्हल शार्कसोबत पोहतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. खरं तर शार्क हे नाव जरी ओठावर आले तरी, त्रेधातिरपिट होते. परंतु कॅटरिनाने बिनधास्तपणे व्हेल शार्कसोबत पोहतानाचा आनंद घेतला आहे. व्हिडीओमध्ये कॅटरिना बिकिनीत बघावयास मिळत असून, तिचे हावभाव पाहता तिच्या मनात व्हेल शार्कविषयी अजिबातच भीती बघावयास मिळत नाही. उलट ती कॅमेºयाला हात दाखवित शार्कच्या दिशेने पोहताना दिसते. वास्तविक कॅटरिनाने ‘वर्ल्ड ओसियन डे’निमित्त हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅटरिनाचा हा अंदाज बघून तिचे चाहते दंग होत असून, सोशल मीडियावर तिचा हा पराक्रम चांगलाच चर्चिला जात आहे. शिवाय तिच्या या धाडसाचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान कॅटरिना सध्या तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या रिलीज डेट लागोपाठ बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेमका केव्हा रिलीज होणार याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर १४ जुलै हा मुहूर्त मिळाला असल्याने, रणबीर आणि कॅटरिनाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नुकतेच या चित्रपटाचे ‘गलती से मिसटेक’ हे गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये कॅटरिना-रणबीरचा अंदाज बघण्यासारखा आहे. सध्या कॅटरिना या चित्रपटाच्या प्रमोशनबरोबरच सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल असून, यामध्ये कॅटरिना जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटामुळे ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. शिवाय या दोघांमध्ये लिंकअपच्याही चर्चा समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली होती की, सलमान आणि कॅटरिनाची जोडी ‘टायगर जिंदा है’नंतर अतुल अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे; मात्र या बातमीत कितपत तथ्य आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.