Join us

​कॅटरिना कैफ म्हणते, सलमान ‘धमाकेदार’, शाहरूख ‘समजदार’ तर आमिर ‘प्रामाणिक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 11:14 IST

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कष्ट करून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींची यादी करायची झाल्यास कॅटरिना कैफ हिचे नाव या यादीत सर्वात वरचे ...

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कष्ट करून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रींची यादी करायची झाल्यास कॅटरिना कैफ हिचे नाव या यादीत सर्वात वरचे असेल. कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी किती मेहनत केलीयं, हे तिचे आधीचे चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल. आजघडीला कॅटरिना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलीकडे एका मुलाखतीत, कॅटरिनाला बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. कॅटने बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’सोबत काम केले आहे. कॅटरिनाने शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितला. सलमानबद्दल कॅटरिनाचा अनुभव धमाकेदार असाच राहिला. कॅटरिनाच्या मते, सलमान खान धमाकेदार व्यक्ति आहे. ज्यांना सलमानसारखे बनायचे आहे, त्या सगळ्यांसाठी तो रोल मॉडेल आहे. तो काय विचार करतोय, याचा अंदाजच तुम्हाला येत नाही. त्याचे हे मौन आणि त्याच्यातील आत्मविश्वास या दोन गोष्टी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात.शाहरूखबद्दलही कॅटरिना बोलली. शाहरूख खान अतिशय बुद्धिमान व समजदार व्यक्ति आहे. तो अद्भूत बोलतो. त्याच्या प्रत्येक शब्दातून त्याचे ज्ञान झळकते. त्याच्यात खूप ऊर्जा आहे. त्याच्या या ऊर्जेला तुम्ही थांबवूच श्कत नाही, असे कॅटरिना म्हणाली.आता उरला आमिर खान. तर कॅटरिनाच्या मते, आमिर खान कामाप्रति कमालीचा प्रामाणिक आहे. त्याच्याइतक्या निष्ठेने काम करणारा दुसरा कुठलाही अभिनेता नाही. तो त्याची बुद्धी, मन आणि शरिराने काम करतो.ALSO READ : कॅटरिना कैफचा इन्स्टाग्राम डेब्यू ठरला दीपिका पादुकोणच्या नाराजीचे कारण?कॅटरिनाने अलीकडे इन्स्टाग्रामवर डेब्यू केले. सध्या कॅटरिना ‘टायगर जिंदा है’  चित्रपटात बिझी आहे. यात ती सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे. लवकरच तिचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात कॅटरिना तिचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर याच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.