Join us

अक्षयकुमारच्या चित्रपटातून कॅटरिना कैफ OUT परिणीती चोप्रा IN

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 14:27 IST

बॉलिवूडमधील काही जोड्या त्यांच्या ऑन केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहेत. यातील एक जोडी आहे ती अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफची. मात्र ...

बॉलिवूडमधील काही जोड्या त्यांच्या ऑन केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहेत. यातील एक जोडी आहे ती अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफची. मात्र अक्षय कुमारने नमस्ते इंग्लडसाठी कॅटरिनाला डावलून परिणीतीच चोप्राची निवड केली आहे  नमस्ते इंग्लड हा कॅटरिना आणि अक्षय कुमारच्या नमस्ते लंडनाचा सीक्वल आहे.  अक्षय आणि कॅटरिनाच्या जोडीने सर्वात आधी हमको दीवाना कर गए याचित्रपटात एकत्र काम केले होते. ज्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. यानंतर या जोडीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले.मात्र सध्या अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप जातायेत. त्यामुळे कदाचित त्यांने कॅटरिना ऐवजी चित्रपटात परिणीतीला स्थान दिले असले. ज्यावेळी अक्षयकुमाराला याबाबत विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला मी आजपर्यंत परिणीती चोप्रासोबत काम केले नाही आहे. ते अतिशय गुणी अभिनेत्री आहे. आता नक्कीच यामागे हेच कारण आहे की आणखीन काही याचा पत्ता लागला नाही. असेही कानावर येते आहे कॅटरिनाचे करिअर जेव्हा पीकवर होते तेव्हा तिने अक्षय बरोबर चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यामुळे अक्षय अपसेट झाला होता. त्यानंतर कॅटरिना आणि अक्षयमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. तेव्हा पासून दोघांमध्ये सुरु झालेले क्लोडवॉर अजून संपलेले नाही. आशा ही कॅटरिना आणि अक्षयच्या जोडी प्रमाणे नमस्ते इंग्लडमधील ही जोडी देखील पडद्यावर हिट होईल.  सध्या अक्षय त्याच्या टॉयलेट एक प्रेमकथाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर  हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे.