Join us  

कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:06 PM

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे.

ठळक मुद्देरिपोर्टनुसार तिच्याकडे आधीच पासून ऑडी कार आहे

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती सलमानचा मेहुणा अपूर्व अग्निहोत्री करतोय.   

मिड-डेच्या रिपोर्टनुसार कॅटने स्वत: ला न्यू रेंज रोवर कार गिफ्ट केली आहे. रिपोर्टनुसार तिच्याकडे आधीच पासून ऑडी कार आहे. कॅटरिना कैफने आपल्या नव्या कारसाठी सेम रेजिस्ट्रेशन नंबर मागितला आहे. कॅटरिना कैफच्या या कारची किंमत 49 ते 65 लाख रुपये आहे. मात्र  कॅटला ही गाडी सलमान खानने गिफ्ट दिली असल्याची चर्चा आहे.    

‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे.  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. ‘भारत’  हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड आॅडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 

टॅग्स :कतरिना कैफसलमान खान