Join us  

'या' अभिनेत्रीला गुलशन ग्रोवरसोबत द्यायचा होता किसींग सीन, त्यासाठी एका बंद खोलीत चक्क दोन तास केला होता सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 12:51 PM

कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' या सिनेमाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. हा बी ग्रेड सिनेमा होता. यात अमिताब बच्चन आणि गुलशन ग्रोवर यांच्या भूमिका होत्या. त्या सिनेमात तिला एक किसींग सीन करायचा होता.

बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी कधी कधी कलाकारांना नको असलेल्या गोष्टी देखील कराव्या लागतात. आवड - निवड अशा कोणतीच्या अटी त्यावेळी जास्त महत्वाच्या नसतात. चंदेरी दुनियेत नाव कमावण्यासाठी येइल तशा ऑफर्स स्विकारत यशाच्या पाय-या चढणारे अनेक कलाकार आहेत. यातच बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफचे देखील नाव गणले जाते. सुरूवातीच्या काळात कतरिना जे काही काम केली त्याचा आज नक्कीच तिला पश्चातापही होत असल्याचे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 

कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' या सिनेमाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. हा बी ग्रेड सिनेमा  होता. यात अमिताब बच्चन आणि गुलशन ग्रोवर यांच्या  भूमिका होत्या. त्या सिनेमात तिला एक किसींग सीन करायचा होता. तो ही गुलशन ग्रोवरबरोबर.

हा सीन करताना तिला अवघडल्यासारखे झाले होते. तरीही अनेक रिटेक्स घेत तिने कसाबसा हा सीन पूर्ण केला होता. जोपर्यंत परफेक्ट सीन देत नाही तोपर्यंत रिटेकवर रिटेकर तर आलेच. हा सीन करण्यासाठी सलग 2 तास बंद खोलीत तिने सरावही केल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. तिच्या संपूर्ण करिअरमध्ये कतरिना अस्वथ झाली होती तर तो हा सीन होता अशी प्रांजळ कबुली तिने दिली होती. 

बॉलीवूडची चिकनी चमेली म्हणून आज कतरिना कैफ लोकप्रिय आहे. घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि अभिनय यामुळे कतरिनानं अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नंबरची अभिनेत्री हे स्थान मिळवलं होतं. बराच काळ कतरिना नंबर वन पदावर होती आणि आजही तिची जादू कायम आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमा कतरिनाकडे आहेत. बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात.

२००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना कोट्यवधी रुपये कमावते.

टॅग्स :गुलशन ग्रोव्हरकतरिना कैफ