Join us  

Star Screen Awards 2018 : कॅटरिना कैफ आणि आलिया भट आमने-सामने, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 5:32 PM

नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्डमध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ, दीपवीर, आलिया भट्ट आणि जॅकलिनसारखे अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती

ठळक मुद्दे कॅटरिना आणि आलियाला दोघी एकमेकांशी गप्पा मारताना दिसतायेतआलियाच्या आधी रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ होती

नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्डमध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ, दीपवीर, आलिया भट्ट आणि जॅकलिनसारखे अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. अवॉर्ड सोहळ्यात रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ दोघी एकत्र दिसल्या. 

 

 

 

 

या अवॉर्ड फंक्शन कॅटरिना आणि आलियाला दोघी एकमेकांशी गप्पा मारताना दिसतायेत. दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. रिपोर्टनुसार दोघींनी एकमेकींना मिठ्ठीदेखील मारली. ऐवढेच नाही तर अवॉर्ड्सच्या शेवटला स्टेजवर आलिया आणि कॅटरिना एकत्र दिसल्या. गेल्या काही दिवसांपासून रणबीरमुळे आलिया भट्ट आणि कॅटरिनाच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.

आलियाच्या आधी रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ होती. कॅट आणि रणबीर लिव्ह-इनमध्ये राहायचे. मात्र त्यानंतर दोघांमध्ये काही तरी खटकले आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. यानंतर रणबीरच्या आयुष्यात आलियाची एंट्री झाली.   आता हे नाते जगजाहिर झाले आहे. दोन्ही कुटुंबाचीही परवानगी मिळाली आहे. २०२० पर्यंत रणबीर व आलिया लग्न करणार, असेही मानले जात आहे. तूर्तास या कपलबद्दलची ताजी बातमी म्हणजे, रणबीरच्या कुटुंबात आलियाचा प्रवेश झालाय.

टॅग्स :स्टार स्क्रिन अवार्ड्सआलिया भटरणबीर कपूरकतरिना कैफ