Join us

​ करिनासाठी सुद्धा संपलाय का ‘कॅट चॅप्टर’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 16:37 IST

‘कॉफी विद करण’च्या चौथ्या सीझनमध्ये करिना कपूरने भाऊ रणबीर कपूरला चांगलेच डिवचले होते. कॅटरिनाच्या नावावरून ती त्याला चिडवतांना दिसली ...

‘कॉफी विद करण’च्या चौथ्या सीझनमध्ये करिना कपूरने भाऊ रणबीर कपूरला चांगलेच डिवचले होते. कॅटरिनाच्या नावावरून ती त्याला चिडवतांना दिसली होती. पण कदाचित तो ‘इतिहास’ झाला. कारण आता करिनाला कॅटरिना आवडेनाशी झाली आहे. तीच काय, तर रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पादुकोण ही सुद्धा करिनाला फारशी कधीच आवडली नव्हती. होय, अलीकडे नेहा धूपिया होस्ट करीत असलेल्या एका शोमध्ये करिनाचे हे ‘बदललेले’ रूप पाहायला मिळाले. रणबीरच्या एक्सगर्लफे्रन्ड कॅटरिना व दीपिकापैकी कोण चांगली होती, असे तुला वाटते? असा प्रश्न करिनाला नेहाने विचारला. या प्रश्नावर करिनाने काय उत्तर द्यावे? तर दोघींपैकी एकही नाही. होय, रणबीरची गर्लफ्रेन्ड म्हणून या दोघींपैकी कुणीही बेस्ट नव्हते, असे करिना म्हणाली. कॅटरिना व दीपिका यापैकी कोण अधिक चांगली अभिनेत्री आहे? असाही एक प्रश्न करिनाला विचारण्यात आला. यावर दीपिका, असे करिना म्हणाली. आज जी कॅटरिना करिनाला रणबीरची गर्लफे्रन्ड म्हणून आवडत नाही, त्याच कॅटरिनाच्या नावावरून करिनाने रणबीरला एकेदिवशी चिडवले होते. पण रणबीरप्रमाणेच कदाचित करिनासाठीही कॅटरिनाचा ‘चॅप्टर’ संपलाय.रणबीर व कॅटचे यावर्षी ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. या ब्रेकअपमागचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. कॅट वा रणबीर दोघांनीही यावर बोलणे टाळले. अर्थात अलीकडे एका मुलाखतीत, कॅट माझ्या आयुष्यातील ‘स्पेशल’ व्यक्ति होती आणि राहील, असे रणबीरने म्हटले होते.  आई-वडिलानंतर माझ्या आयुष्यातील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्ति कोण असेल तर ती कॅट आहे, असेही तो म्हणाला होता.