Join us  

Karwa Chauth 2018 अनुष्का,सोनम, रवीना, बिपाशा, शिल्पासह बॉलिवूडने असा साजरा केला करवा चौथ! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 9:16 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथचे (Karwa Chauth) व्रत साजरे झाले. अनेक सेलिब्रिटी या पुजेत सहभागी झालेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल कपूर यांच्या घरी करवाचौथचे (Karwa Chauth) व्रत साजरे झाले. अनेक सेलिब्रिटी या पुजेत सहभागी झालेत. अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर, अभिनेत्री नीलम, रीमा जैन, डेव्हिड धवन यांची पत्नी लाली धवन, कृषिका लुला, रवीना टंडन आदींनी एकत्र येत पतीच्या दीर्घायुष्याची कामना करणारे हे व्रत साजरे केले.

 यावेळी सर्वांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना प्रचंड मिस केले. महिप कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर सर्वांचा एक फोटो शेअर केला.

 या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मिस यू श्री’, असे लिहिले. दरवर्षी श्रीदेवीही या पुजेत सहभागी होत. यंदा मात्र श्रीदेवी आपल्यात नाहीत. याचवर्षी फेबु्रवारीत त्यांचे निधन झाले. गतवर्षीही अनिल कपूर यांच्या घरीच करवा चौथची पुजा झाली होती. यावेळी श्रीदेवींनी जरीची साडी नेसली होती.याचवर्षी करवा चौथच्या पुजेसाठी रवीना टंडन लाल रंगाचा ड्रेस घालून पोहोचली.  

अनुष्का शर्माचा हा पहिला करवा चौथ. तिनेही विराटच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले. यावेळी अनुष्का व विराटने चंद्रासोबत फोटो काढला़ त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  शिल्पा शेट्टीने यावर्षी श्रीलंकेत करवा चौथचे व्रत साजरे केले.

सोनम कपूरचा यंदाचा पहिला करवा चौथ होता. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी एकत्र करवा चौथ साजरा केला. आज आम्ही दोघांनीही एकमेकांसाठी व्रत ठेवल्याचे सोनमने आपल्या सोशल मीडियावर सांगितले होते. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनीही अशा झकास अंदाजात करवा चौथ साजरा केला.

टॅग्स :अनुष्का शर्मासोनम कपूरशिल्पा शेट्टीरवीना टंडनअनिल कपूर