Join us  

अन् कार्तिक आर्यनने नाकारला १० कोटींचा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:02 PM

‘सोनू की टीटू की स्वीटी’ हा कार्तिकच्या करिअरमधील पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट होता. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनला एक चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटासाठी कार्तिकला १० कोटी रूपये फी मिळणार होती. पण कार्तिकने म्हणे, या चित्रपटाला चक्क नकार कळवला.

ठळक मुद्देलवकरच ‘लुका छुपी’ या चित्रपटात कार्तिक दिसणार आहे. यात क्रिती सॅनन त्याच्या अपोझिट दिसणार आहे.

‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन जोरात आहे. ‘सोनू की टीटू की स्वीटी’ हा कार्तिकच्या करिअरमधील पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट होता. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनला एक चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटासाठी कार्तिकला १० कोटी रूपये फी मिळणार होती. पण कार्तिकने म्हणे, या चित्रपटाला चक्क नकार कळवला.

होय, खुद्द कार्तिकनेचं ‘मिड डे’ ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला. ‘सोनू की टीटू की स्वीटी’नंतर मला एक चित्रपट ऑफर झाला होता. यासाठी मेकर्स मला १० कोटी द्यायला तयार होते. पण मी हा चित्रपट नाकारला. कारण मी चित्रपटातील भूमिकेत फिट बसणार नाही, असे माझे मलाच वाटत होते. त्याक्षणी  पैसा नाही तर मला माझी भूमिका महत्त्वाची वाटली. आजही पैसापेक्षा माझ्यासाठी माझी भूमिका मोठी आहे. पैसा कमावणे हा माझा उद्देश नव्हताच. आजही नाही. पुढेही नसणार. माझे काम हेच मला पैसा मिळवून देईल, असे कार्तिक म्हणाला.

यापूर्वी ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये बोलताना कार्तिकने आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले होते. इंजिनिअरिंगचा अभ्यास करता करता कार्तिक अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यासाठी हातपाय मारत होता. या काळात दोन खोल्यांच्या घरात १२ लोकांसोबत एकत्र राहण्याची वेळ त्याच्यावर आली. पुढे त्याला ‘प्यार का पंचनामा’ ऑफर झाला आणि तेव्हा कुठे त्याने घरच्यांना अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करायचा आपला निर्णय सांगितला.लवकरच ‘लुका छुपी’ या चित्रपटात कार्तिक दिसणार आहे. यात क्रिती सॅनन त्याच्या अपोझिट दिसणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यन