Join us  

कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणला शिकवली कविता...पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 11:15 AM

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता.

ठळक मुद्देदीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर गतवर्षांत ‘पद्मावत’ हा दीपिकाचा केवळ एक चित्रपट आला. पण तरिही गत वर्षांत दीपिका प्रचंड चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची जगभर चर्चा

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता. तूर्तास दीपिका व कार्तिकने मुलांसोबत केलेल्या या धम्माल मस्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कार्तिक दीपिकाला ‘मछली जल की रानी है...’ ही कविता शिकवताना दिसतो आहे. दीपिका व कार्तिकच्या पाठोपाठी मुलेही कविता म्हणतांना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी कार्तिक व दीपिका ‘बळे बळे’ पडतात आणि मुले खो खो करत सुटतात...

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर गतवर्षांत ‘पद्मावत’ हा दीपिकाचा केवळ एक चित्रपट आला. पण तरिही गत वर्षांत दीपिका प्रचंड चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची जगभर चर्चा झाली. लग्नानंतर दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असेल. या चित्रपटात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिचा संघर्ष पडद्यावर जिवंत करणार आहे.

कार्तिककडेही काही मोठे चित्रपट आहे. लवकरच त्याचा ‘लुका छिपी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. यात त्याने मथुराच्या एका लोकल टीव्ही रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. या पाठोपाठ ‘किरीक पार्टी’च्या रिमेकमध्येही तो झळकणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणकार्तिक आर्यन