‘उडता पंजाब’ मध्ये करिना बनली ‘सामरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:32 IST
करीना कपूर खान हिला खरंतर खुप स्टायलिश मानले जाते. स्टाईल आयकॉन म्हणून बेबोकडे पाहिले जाते. मात्र, ती तिचा आगामी ...
‘उडता पंजाब’ मध्ये करिना बनली ‘सामरी’
करीना कपूर खान हिला खरंतर खुप स्टायलिश मानले जाते. स्टाईल आयकॉन म्हणून बेबोकडे पाहिले जाते. मात्र, ती तिचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये एकदम साध्या लुक असलेल्या डॉक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपट अत्यंत गंभीर आणि सामरी यांच्या कथेवर आधारित आहे. आता ‘सामरी’ म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! तर ‘सामरी’ म्हणजे संकटकाळी मदत करणारा भला व्यक्ती. या चित्रपटात हा सामरी म्हणजे करिना कपूर खान आहे. ती म्हणते,‘ मी एका डॉक्टरची भूमिका केली आहे. माझी भूमिका अत्यंत वेगळी असून चित्रपटाचे एकंदरित वातावरणच खुप आल्हाददायक आणि चांगले आहे. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी जवळपास चार वर्षांच्या रिसर्चनंतर हा चित्रपट साकारत आहे. चित्रपट पंजाबमधील औषधी संबंधित अडचणींवर आधारित आहे. ’ ‘की अॅण्ड का’ मधील तिच्या भूमिकेप्रमाणे आहे का ? असे विचारण्यात आले असता ती म्हणते,‘ की अॅण्ड का मधील माझी भूमिका अत्यंत फनी, कॉमेडी, एंटरटेनिंग असून यातली अत्यंत गंभीर प्रकारची आहे. जूनमध्ये चित्रपट रिलीज होणार असून आलिया भट्ट, शाहीद कपूर आणि प्रभ्ज्योत सिंग हे असणार आहेत. पंजाबी अभिनेता दिलजित दोसंघ हा करिनासोबत भूमिका करणार आहे.------------------------