Join us  

केआरकेने करण जोहरला केले ‘प्रपोज’! नेटक-यांनी अशी घेतली मजा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:51 PM

कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे  वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार?

ठळक मुद्दे ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत.

कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे  वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार. त्याने काय करावे तर, यावेळी त्याने थेट करण जोहरला प्रपोज केले. होय, चक्क करणला प्रपोज केले. ‘डियर करण, व्हॅलेन्टाईन डेसाठी माझ्याकडे एकही गर्लफ्रेन्ड नाही. काय तू माझा व्हॅलेन्टाई डे पार्टनर बनशील? तुझ्या उत्तराची प्रतीक्षा असेल,’ असे ट्वीट केआरकेने केले.

केआरकेच्या या प्रपोजलचे करणने अद्याप कुठलेही उत्तर दिलेले नाही. पण युजर्सने मात्र केआरकेला द्यायचे ते उत्तर दिले. एका युजरने केआरकेला करणऐवजी दीपक कलालचे नाव सुचवले. केआरके तुझ्यासाठी दीपक कलाल बेस्ट राहिल,असे या युजरने लिहिले. एका युजरने केआरकेला ‘बचके रहो भाई,’ अशा शब्दांत सावध केले. करण तुझ्या या पोस्टचे खरमरीत उत्तर देईल, बचके रहो भाई, असे या युजरने म्हटले. एकंदर काय तर करणला प्रपोज करून केआरके फसला आणि चांगलाच ट्रोल झाला.    काही दिवसांपूर्वी केआरकेने त्याला कॅन्सर असल्याचा खुलासा केला होता. ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नांना नाही म्हणता, म्हणता चांगलेच यश आले आणि त्यामुळेच चर्चेत राहण्याचा हा फंडा आजही केआरके वापरताना दिसतोय. त्यामुळे  करणला प्रपोज करणे हाही असाच एक फंडा आहे, हे सांगणे नकोच.

 

टॅग्स :कमाल आर खानकरण जोहर