Join us  

फोटोतील या दोन चिमुरड्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडवर गाजवतायेत अधिराज्य, Guess करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 2:07 PM

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर कुटुंबाला भले कोण विसरू शकतो. या कुटुंबातील कित्येक सदस्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या कुटुंबातील दोन मुलींची तर बात काही औरच आहे. अशी पहिली वेळ होती की कपूर कुटुंबातील मुलींनी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.   

फोटोतील या दोन चिमुरड्या कोण आहेत, हे तुम्हाला समजलं असेलच ना... या कोणी दुसऱ्या नसून करिश्मा कपूर व करीना कपूर आहे. करिश्मानं प्रेमानं आपली छोटी बहिण करीनाला कसं जवळ घेऊन फोटोसाठी पोझ दिलीय. त्या दोघी फोटोत खूपच क्यूट दिसत आहेत. करीना कपूरच्या फॅन पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय.

करीना सध्या सैफ व तैमूरसोबत युरोपमध्ये सुट्ट्या व्यतित करत आहे. त्यांच्या फॅन पेजवरून तिघांचे फोटो शेअर होत असतात. नुकतेच सुट्टी एन्जॉय करत असलेल्या करीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांचा एक सेल्फी समोर आला आहे ज्यात ते मेकअपशिवाय होते. या फोटोवरून करीनाला ट्रोल करायला सुरूवात केली.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर करीना लवकरच अंग्रेजी मीडियम चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणारेय. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियमचा सीक्वल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया करत आहेत.

या चित्रपटात इरफान खान व राधिका मदन मुख्य भूमिकेत आहेत. ते दोघे लंडनमध्ये सध्या चित्रीकरण करत आहे. लवकरच त्यांना करीना जॉईन करणार आहे.

तर करिश्मा कपूर लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. ती एकता कपूरच्या मेंटलहूड वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करिश्माला कमबॅक करण्यासाठी करिश्माचा जीजा सैफ अली खान व तिची बहिण करीना कपूरने समजूत घातल्याचे समजते आहे. शेवटची करीश्मा डेंजरस इश्कमध्ये दिसली होती.

 

टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूर