करिना बेबी बम्प दाखवायला घाबरत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 14:59 IST
गरोदरपणात आपले पोट लपवण्याचा अनेक अभिनेत्री प्रयत्न करत असतात. त्यामुळे गरोदरपणात मीडियापासून दूरच राहाण्याचा अभिनेत्री निर्णय घेतात. काही बोटावर ...
करिना बेबी बम्प दाखवायला घाबरत नाही
गरोदरपणात आपले पोट लपवण्याचा अनेक अभिनेत्री प्रयत्न करत असतात. त्यामुळे गरोदरपणात मीडियापासून दूरच राहाण्याचा अभिनेत्री निर्णय घेतात. काही बोटावर मोजण्याइतक्याच अभिनेत्री गरोदरपणातही अनेक समारंभांना उपस्थित राहतात. करिना कपूर गरोदर आहे ही बातमी आल्यानंतर ती चित्रपटात काम करणार नाही किंवा ती मीडियामध्ये काही काळासाठी तरी झळकणार नाही असे तिच्या चाहत्यांना वाटले होते. पण करिना अजूनही अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत आहे. तसेच ती अजूनही चित्रीकरण करत आहे. करिना जाहिरात करत असलेल्या एका प्रोडक्टच्या लाँचच्यावेळी तिने हजेरी लावली. करिनाने काही दिवसांपूर्वी मीडियासाठी अशी खास पोज दिली. करिनाने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकदेखील केला करिनाने एका जाहिरातीचे चित्रीकरण नुकतेच केले करिना कपूर मेहबूब स्टुडिओमध्ये एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आली होती