करिनाने दिले शाहिदला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:40 IST
उडता पंजाब या चित्रपटात करिना कपूर आणि शाहिद कपूर काम करत आहेत. शाहिद आणि करिना अनेक वर्षं नात्यात होते. ...
करिनाने दिले शाहिदला उत्तर
उडता पंजाब या चित्रपटात करिना कपूर आणि शाहिद कपूर काम करत आहेत. शाहिद आणि करिना अनेक वर्षं नात्यात होते. ब्रेकअपनंतर एकमेकांच्या समोर येणे ते दोघेही नेहमीच टाळत असत. पण काही दिवसांपूर्वी उडता पंजाब या चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्ताने करिना आणि शाहिद समोरासमोर आले होते. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी मोठी झेप घेत या चित्रपटाचे प्रमोशन करा असे शाहिद त्याच्या सहकलाकरांना म्हणाला होता. यावर करिनाने खूपच चांगले उत्तर दिले होते. ती म्हणाली होती, शाहिद तू हे सांगत आहेस. कारण तू तर दारू पित नाहीस की धुम्रपान करत नाहीस, मग तू कसा काय उडणार... करिनाने दिलेल्या या उत्तरामुळे सगळ्यांना नक्कीच आश्चर्य वाटले होते.