Join us

‘करिना’ने घातला ३२ किलोचा लहेंगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:13 IST

दि ग्दर्शक आर.बल्की यांच्या 'की अँण्ड का' या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री करीना कपूर खान हिने चित्रपटातील गाण्यासाठी मनीष मल्होत्रा ...

दि ग्दर्शक आर.बल्की यांच्या 'की अँण्ड का' या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री करीना कपूर खान हिने चित्रपटातील गाण्यासाठी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ३२ किलोचा लेहंगा घातला आहे. जरी करिना संपूर्ण चित्रपटात वेस्टर्न लुकमध्ये दिसत असली तरी तिने तिच्या चाहत्यांना बिल्कुल असमाधानी ठेवलेले नाही. तिने 'की अँण्ड का ' चित्रपटातील एका गाण्यासाठी संपूर्ण इंडियन स्टाईलचा ३२ किलोचा लेहंगा घातला आहे. बॉस्को यांनी गाण्याला कोरिओग्राफ केले असून या लेहंग्यावर हेवी जरदोसी वर्क केले असून संपूर्ण नेटचे आच्छादन केले आहे. दोन दिवसांत तिने अनेक वेळेस एकच शॉट केला आहे. गरम वातावरणातही करिनाने हा जड लेहंगा घालून जवळपास दोन दिवस सलग शूटिंग केले तसेच तिने तिचा कुल लुक सांभाळला आहे. चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर असणार आहे.