Join us  

kareena kapoor च्या छोट्या मुलाचा फोटो चुकून Randhir Kapoor यांच्याकडून झाला शेअर, त्यानंतर लगेचच केला डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 11:21 AM

Randhir Kapoor 'accidentally' posted new grandchild along with Taimur Ali Khan's baby picture : रणधीर कपूर यांनी फोटो डिलीट करेपर्यंत तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून नेटीझन्स कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात. जन्मानंतर लगेच तैमूरची झलक चाहत्यांना दाखवणारे सैफ आणि करिना यांनी अजूनही त्यांचा दुसरा मुलगा छोटे नवाबची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. 

त्यामुळे तैमूरचा लहान भाऊ कसा दिसतो, त्याचे नाव काय? अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात नेटीझन्स रस असला तरी त्यांची इच्छा अजूनतरी पुर्ण झालेली नाही. अशात करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी चुकून छोटे नवाबचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र लगेचच तो डिलीटही केला. चुकून का होईनना रणधीर कपूरमुळे काही वेळेसाठी का होईन ना, नेटीझन्सना तैमूरच्या छोट्या भावाची झलक पाहायला मिळाली. 

5 एप्रिल रोजी रणधीर कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर हँडलवर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला. पहिल्या फोटोत तैमूरचा फोटो होता तर दुस-या फोटोमध्ये हुबेहबु तैमूरसारखाच दिसणारा आणखीन एक फोटो होता. रणधीर कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणतेही कॅप्शन लिहिले नव्हते, दोन फोटोंचा कोलाज शेअर केल्यानंतर दुसरा फोटो हा  तैमूरच्या धाकट्या भावाचे असल्याचा नेटीझन्सने अंदाज लावला.

चूकून शेअर झालेला हा फोटो रणधीर कपूर यांनी काही वेळानंतर डिलीटही केला, मात्र तोपर्यंत तो फोटो सोशल मीडियावर वा-याप्रमाणे व्हायरल झाला होता. त्यामुळे फोटो डिलीट झाला असला तरी तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटीझन्स कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

21 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता करीना कपूरने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला होता. डिलीव्हरी आधीच सैफ आणि करिना यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणेच दुसरे बाळ माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यात सैफ आणि करीना देखील बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत.

टॅग्स :करिना कपूररणधीर कपूर