Join us  

 करिना कपूरच्या नणंदबाईने दिली हिंट? युजर्स म्हणाले, दुसराही मुलगाच का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:00 PM

सैफ अली खानची बहीण व करिनाची नणंद सबा अली खान हिने शेअर केलेल्या पोस्टची तूर्तास जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देसबाने तिची वहिनी करीनासाठी काही ज्वेलरी डिझाईन केल्या आहेत. 42 वर्षीय सबाने आतापर्यंत लग्न केले नाही.

करिना कपूर लवकरच दुस-या बाळाला जन्म देणार आहे. साहजिकच करिनाला मुलगा होतो की मुलगी हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास सैफ अली खानची बहीण व करिनाची नणंद सबा अली खान हिने शेअर केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. सबाची ही पोस्ट वाचल्यानंतर करिनाला दुसरा मुलगाच झाला की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.तर सबा अली खानने अशी काय पोस्ट केली. तर तिने एक सैफचा जुना फोटो शेअर केला. या फोटोत सैफसोबत त्याचा मुलगा (सैफ व अमृताचा मुलगा) इब्राहिमही दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सबाने दिलेले कॅप्शन लक्षवेधी आहे.

‘हा एक छोटीशी हिंट...माझा चॅम्प....’, असे कॅप्शन सबाने या फोटोला दिले आहे. सबाने हिंट या शब्दाचा प्रयोग करताच, चाहत्यांनी या शब्दाचा संबंध थेट करिनाच्या दुस-या बाळाशी जोडत दुसराही मुलगाच का? असा सवाल करणे सुरु केले आहे.करिनाने बाळाला जन्म दिल्याची अद्याप कुठलाही अधिकृत माहिती नाही. तिच्या डिलिव्हरीनंतरच करिनाला मुलगा झाला की मुलगी ते कळणार आहे. पण चाहत्यांनी मात्र आत्तापासूनच तर्कवितर्क लढवणे सुरु केले आहे.

 सबा सैफपेक्षा छोटी आणि सोहापेक्षा मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबा अली खानकडे जवळपास 2700 कोटी रुपयांची संपत्ती आहे.  सैफ आणि सोहा यांच्यामध्ये अभिनय कौशल्य त्यांची आई शर्मिला टागौर यांच्याकडून मिळाले  आहे. मात्र सबा पहिल्यापासूनच लाइमलाइटपासून दूर आहे. फॅमिली फंक्शनशिवाय ती कुठेच दिसत नाही. प्रोफेशनने ती ज्वेलरी डिझायनर आहे. नेहमी कॅमे-यापासून दूर असणा-या सबाने कधीच चित्रपटात काम करण्याबाबत विचार केला नाही. कारण ती खूप लाजाळू आहे. सबाने काही दिवसांपूर्वी स्वत:चे डायमंड रेंज सुरू केली होती.  

सबाने तिची वहिनी करीनासाठी काही ज्वेलरी डिझाईन केल्या आहेत. 42 वर्षीय सबाने आतापर्यंत लग्न केले नाही. सबाचे करीनासोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे. बिझनेस व्यतिरिक्त सबा नवाब कुटुंबाची कोटींच्या संपत्तीची देखरेख करते आहे. संपत्तीच्या कामाव्यतिरिक्त ती औकाफ-ए-शाही नामक एका संस्थेची प्रमुख आहे. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान