करिना कपूरचा (Kareena Kapoor) दुसरा मुलगा कसा दिसतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याची एक झलक पाहण्याची चाहत्यांची उत्कंठा शिगेला पाहोचली आहे. त्याचे नाव जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. पण अद्याप करिनाने आपल्या लाडक्या लेकाचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. आता करिनाने छोट्या मुलाची एक झलक दाखवणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.बेबोने इन्स्टाग्रामवर छोट्या नवाबाचा फोटो शेअर केला आहे. यात बेबोचा तान्हुला बेडवर पहुडलेला आहे आणि सैफ (Saif Ali Khan ) व तैमूर त्याच्यासोबत खेळताना दिसत आहेत. अर्थात या फोटोतही करिनाने बाळाचा चेहरा लपवलेला आहे. बाळाच्या चेह-यावर इमोजी पेस्ट करत, त्याचा चेहरा दिसू नये, याची काळजी घेतली आहे़. (Kareena Kapoor shares photo of her second son)
‘ माझा विकेण्ड काहीसा असा असतो, तुमचा कसा असतो मित्रांनो?,’ असे कॅप्शन करिनाने या फोटोला दिले आहे. चेहरा दिसत नसला तरी, करिनाच्या बाळाचा हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.काही दिवसांपूर्वी आजोबा रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यांनी दोन फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला होता. या फोटोतील बाळ सैफिनाचा मुलगा असल्याचे मानले गेले होते. अर्थात नंतर रणधीर यांनी हा फोटो डिलीट केला होता.