Join us  

"Six Packs दाखवणाऱ्यांनो शर्ट घाला", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "तो हॉट दिसतो म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 2:55 PM

सिक्स पॅक्स दाखवून स्वत:ला हिरो समजणाऱ्या अभिनेत्यांना बॉलिवूडच्या बेबोने खडे बोल सुनावले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने 'बॉलिवूड स्टार्स'बाबत भाष्य करताना केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

बॉलिवूड हिरो म्हणजे सिक्स पॅक्स अॅब्स, तगडी शरीरयष्टी आणि हँडसम दिसणारा अभिनेता सगळ्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहतो. पण, केवळ सिक्स पॅक्स दाखवून स्वत:ला हिरो समजणाऱ्या अभिनेत्यांना बॉलिवूडच्या बेबोने खडे बोल सुनावले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने 'बॉलिवूड स्टार्स'बाबत भाष्य करताना केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

"तुमच्याकडे टॅलेंट असेल, प्रेक्षकांना तुम्ही आवडत असाल, तर तुम्हाला प्रसिद्धीही मिळेल. याच्याकडे सिक्स पॅक्स आहेत, तो हॉट दिसतो, म्हणून तो मोठा स्टार आहे, असं नाही. कधी कधी मला सिक्स पॅक्स अॅब्स दाखवणाऱ्या अभिनेत्यांना सांगावसं वाटतं की प्लीज शर्ट घाला. मला तुमच्याकडे बघवतही नाही आहे." असं करीना फिल्म कंम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

"तुम्ही जर चांगले कलाकार असाल तर तुम्ही या इंडस्ट्रीत टिकू शकता", असं म्हणत करीनाने बॉबी देओलचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, "आता बॉबी विविधांगी भूमिका साकारत आहे. त्याच्याकडे असलेलं टॅलेंट तो एक्प्लोअर करत आहे. आणि त्याला आता चांगल्या संधीही मिळत आहेत. चांगल्या अभिनेत्याला कोणीही थांबवू शकत नाही." 

दरम्यान, करीना सुजोय घोष यांच्या 'जाने जान'मध्ये दिसली होती. लवकरच ती 'द बकिंघम मर्डर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. करीना रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम ३'मध्येही झळकणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसेलिब्रिटी