ग्लॅमरस अवतारात रॅम्पवर उतरली करिना कपूर! पाहा, खास व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 14:01 IST
शनिवारी केनियाची राजधानी नैरोबी येथे रंगलेल्या एका फॅशन शोमध्ये करिनाने आपल्या ग्लॅमरचा तडका लावला.
ग्लॅमरस अवतारात रॅम्पवर उतरली करिना कपूर! पाहा, खास व्हिडिओ!!
करिना कपूर सध्या मुलगा तैमूर अली खान याच्या संगोपनासोबतच चित्रपटांतही बिझी आहे. सोबतच फिटनेस आणि फॅशन यावरही करिना सध्या विशेष लक्ष देतेयं. प्रसूतीनंतर काहीच महिन्यांत करिना वजन घटवून पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात पोहोचली आहे. शनिवारी केनियाची राजधानी नैरोबी येथे रंगलेल्या एका फॅशन शोमध्ये करिनाने आपल्या ग्लॅमरचा तडका लावला. फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी ती रॅम्पवर उतरली आणि आपल्या खास अंदाजाने तिने सगळ्यांची मने जिंकलीत. मनीष मल्होत्राच्या शोमधील करिनाचे काही फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. मनीषनेच डिझाईन केलेला न्यूड लहंगा करिनाने परिधान केला होता. आता या ड्रेसमध्ये करिना किती सुंदर दिसतेयं, हे आम्ही सांगण्याऐवजी तुम्हीच पाहिलेले बरे. ALSO READ :छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!तुम्ही जाणताचं की, करिना फिटनेसच्याबाबतीत किती गंभीर आहे. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन खूप वाढले होते. गेल्या काही महिन्यांपासून करिना हे वजन कमी करण्यासाठी घाम गाळत होती. या काळात करिनाने आपले २० किलो वजन कमी केले. यासाठी करिना कडक डाएटवर होती. वर्कआऊट आणि कडक डाएट फॉलो केल्यानंतर आता कदाचित करिना आपल्या परफेक्ट शेपमध्ये पोहोचली आहे. सध्या करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना कपूरशिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. शशांक घोष दिग्दर्शित हा चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे. नुकतीच करिना दिल्लीचे एक शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परतली आहे. पहिल्या शूटींग शेड्यूलसाठी करिना दिल्लीला गेली तेव्हा दहा महिन्यांचा तैमूर तिच्यासोबत होता. अर्थात सेटवरच्या फोटोंमध्ये तैमूर कुठेही दिसला नाही. मात्र एका व्हिडिओत ड्रेसिंग रूममध्ये बसलेली करिना तैमूरला शोधतांना दिसली होती.