Join us  

करिना, दीपिकाला भावली मोदींची ‘मन की बात’, महिलांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:38 PM

मोदींची ‘मन की बात’ संपताच करिना, दीपिका दोघींनीही ‘मन की बात’ हॅशटॅगसह टि्वट केले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 31 जानेवारी रोजी मन की बात कार्यक्रमाला संबोधित केले.

काल रविवारी ‘मन की बात’द्वारे देशाला संबोधित केले. यावेळी पीएम नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानावर भाष्य केले. मोदी यांनी देशातील महिला आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले. त्यांच्या या कौतुकाने अभिनेत्री करिना कपूरदीपिका पादुकोण भलत्याच इम्प्रेस झाल्यात.  इतक्या की, मोदींची ‘मन की बात’ संपताच दोघींनीही ‘मन की बात’ हॅशटॅगसह टि्वट केले.

‘नॉन स्टॉप कमिर्शिअल फ्लाइटपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यापर्यंत समाजातील महिलांची भागीदारी कित्येक पटीने वाढली आहे. देशाची लेक (राष्ट्र की बेटी) आज निर्भीड, शूर आहे आणि राष्ट्र उभारणीच्या कामात बरोबरीने काम करतेय,’ असे टि्वट करिना कपूरने केले. या  #WomenSupportingWomen #MannKiBaat #PMOINDIA  हॅशटॅगसह तिने ही पोस्ट शेअर केली.

करिना कपूरशिवाय दीपिका पादुकोण हिनेही महिला सशक्तीकरणाचे कौतुक केले. दीपिकाने भारताच्या पीएमओचे रिटि्वट करत सोबत महात्मा गांधीचे एक कोट लिहिले. ‘तुम्हाला जगात जसा बदल हवा आहे, तसे बना- महात्मा गांधी... हे शब्द जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे टि्वट तिने केले.

काय म्हणाले मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 31 जानेवारी रोजी मन की बात कार्यक्रमाला संबोधित केले.  देशातील महिला वैमानिकांच्या पथकाने उत्तर धू्रवावरून जगातील सर्वाधिक लांबीच्या हवाई मार्गावर उड्डाण केले. 16 हजार किमीचे अंतर कापून या महिला बेंगळुरूला उतरल्या. या उपक्रमाचे मोदींनी मन की बातमध्ये कौतुक केले. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाºया पहिल्या महिला पायलट ठरलेल्या भारतीय वायुसेनेच्या दोन महिला अधिकाºयांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दोन महिला आयएएफ अधिकाºयांनी इतिहास रचताना आपण पाहिले असेल. प्रत्येक क्षेत्रात देशातील महिलांचा सहभाग सतत वाढत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :करिना कपूरदीपिका पादुकोणमन की बात