Join us

करण सिंग ग्रोव्हरने पत्नी बिपाशा बसूला दिले अनमोल गिफ्ट, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 22:31 IST

करण सिंग ग्रोव्हरने पत्नी बिपाशा बसूला एक अनमोल गिफ्ट दिले आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा पती अभिनेता करण सिंग ग्रोवर यांनी त्यावेळी खळबळ उडवून दिली, जेव्हा दोघेही कंडोमच्या जाहिरातीमध्ये झळकले. तेव्हापासून हे दोघे कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहत आहेत. असो, आता या दांपत्याविषयी सांगण्याचे कारण असे की, करणने पत्नी बिपाशाला एक अनमोल गिफ्ट दिले आहे, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी बिपाशा गर्भवती असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या; मात्र या अफवा असल्याचे बिपाशाने स्पष्ट केले होते. अशात करणने आता तिला अनमोल गिफ्ट दिल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक करण सिंग ग्रोवरने पत्नी बिपाशाला एक खास गिफ्ट दिले आहे, ज्यामुळे बिपाशा भलतीच खूश आहे. करणने एक पेटिंग बनवून ते बिपाशाला गिफ्ट केले. त्याचा फोटोही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला एब्सट्रॅक्ट आर्ट पसंत आहे, कारण या कॅनव्हॉसवर माझ्या भावना व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचे मी समजतो. यामुळे मला काहीसा दिलासा मिळतो. यासाठी अधिकाधिक वेळ देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे.’ दरम्यान, करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू बºयाच काळापासून चित्रपटांमधून गायब आहेत. हे दोघे अखेरीस अलोन या चित्रपटात बघावयास मिळाले होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. परंतु या चित्रपटाच्या सेटवर हे दोघे एकत्र आले. पुढे त्यांनी लग्न केले. सध्या हे दांपत्य त्यांच्या संसारात व्यस्त आहे.