Join us

​करिना म्हणते रणबीर सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:36 IST

रणबीर कपूरला आता एका हिट चित्रपटाची आशा आहे. मागील तीन वर्षापासून त्याचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. ‘ये जवानी ...

रणबीर कपूरला आता एका हिट चित्रपटाची आशा आहे. मागील तीन वर्षापासून त्याचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. ‘ये जवानी ये दीवाणी’ हा त्याचा 2013 मध्ये आलेला चित्रपट हिट ठरला होता. त्यामुळे त्याला आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाकडून खूप काही आशा आहेत. करिना म्हणते की, रणबीर हा बॉलिवूडचा सुपरस्टार असून, एक डझन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही तो सुपरस्टारच राहील. प्रत्येक अभिनेताच्या करिअरमध्ये फ्लॉप व हिट चित्रपट येतात. माझेही काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. ऐ दिल है मुश्किल मुळे रणवीर चांगले दिवस येतील असेही करिना म्हणाली.