Join us

'ही' अभिनेत्री आहे करण जोहरची लव्ह गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 15:03 IST

करण जोहरचे चित्रपट हे प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी लव्ह गुरु असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का करण जोहरची लव्ह गुरु ...

करण जोहरचे चित्रपट हे प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी लव्ह गुरु असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का करण जोहरची लव्ह गुरु कोण आहे ते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्रीने या आधी करण जोहरच्या अग्निपथ आणि बार बार देखो या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अभिनेत्री आहे कॅटरिना कैफ. कॅटरिना कैफने सांगितले की करण जोहरने तिच्याकडून एकदा प्रेमाबाबतचा सल्ला घेतला आहे. सध्या 104.8 इश्क एफएम वर कॉलिंग करण नावाचा शो सुरु आहे यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रेम प्रकरणांबाबत सल्ला देतो. कॅटरिना म्हणाली मला त्यांने कधी सल्ला प्रेमाबाबत सल्ला नाही दिला मात्र मीच त्याला सल्ला दिला. करण जोहरचा नवा वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहे. ड्रगन, सिम्बा, राजी, स्टुंडट ऑफ द इयर 2, धडक असे एका पेक्षा एक अनेक चित्रपट. ड्रगनमध्ये पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र काम करतायेत.  हा चित्रपट तीन भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.  ALSO RAED :  ​करण जोहरला निर्माता बनायचे नव्हते तर या क्षेत्रात करायचे होते करियरयाचित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे.  त्याच बरोबर धडक चित्रपटातून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्यासोबत या चित्रपटात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर डेब्यू करतोय. या चित्रपटाची शूटिंग सध्या जयपूर, राजस्थान येथे सुरू झाली आहे.  मेघना गुलजार दिग्दर्शित  राजी चित्रपट ही याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारते आहे. जिचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते.  आलियाच्या नवऱ्याची भूमिका विकी कौशल साकारणार आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.  ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ चित्रपट सुद्धा याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.