Join us  

बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:41 AM

करण जोहरने  बॅन्डवाल्यांची कमतरताच भरुन काढली आहे.  त्याचवेळी दुस-या एका युजरने म्हटले आहे की, वरुणच्या लग्नात करण जोहर डान्स करत धमाल करणार आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल रविवारी 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकत त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

चित्र विचित्र ड्रेसमध्ये त्याने यावेळी परिधान केला होता.करण जोहरच्या या लूकमुळे  सोशल मीडियावर तो जबरदस्त ट्रोल होत आहे. एका व्यक्तीने लिहिले - करण जोहरने  बॅन्डवाल्यांची कमतरताच भरुन काढली आहे.  त्याचवेळी दुस-या एका युजरने म्हटले आहे की, वरुणच्या लग्नात करण जोहर डान्स करत धमाल करणार आहे. सोनम कपूरच्या लग्नात करण जोहरने जबरदस्त डान्स केला होता. अजूनही नेटीझन्स त्याचा तो डान्स विसरलेले नाहीत. 

अशा प्रकारे ट्रोल होणे करणसाठी ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो अनेकदा ट्रोल झाला आहे. अनेकदा त्याची सोशल मीडियावर नेटीझन्स फुल ऑन त्याची खिल्ली उडवतात. इतकेच काय तर करण जोहरवर फनी मीम्स बनवत ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केले जातात. पण करण जोहरला ट्रोलींगचा अजिबात फरक पडत नाही. त्यामुळे तो जसा आहे तसा राहतो आणि जे वाट्टेल ते बोलतो. 

'राहुल'.. नाम तो सुना ही होगा म्हणत पहिल्यांदाच सांगितले करण जोहरने ते सिक्रेट

करण जोहरनेही 'कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्याच्याबरोबर काजोलही कपिलच्या शोमध्ये उपस्थित होती. यादरम्यान दोघांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक कथा शेअर केल्या आणि आणि शोच्या संपूर्ण टीमसोबत बरीच मस्तीही केली रसिकांचेही भरघोस मनोरंजन केले.पहिल्यांदाच त्याने त्याच्या नावाचा खुलासा केला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, त्याचे खरे नाव करण जोहर नसून राहुल कुमार जोहर असे होते . जिथे माझा जन्म झाला आहे तिथे आजही मला राहुल कुमार म्हणूनच ओळखतात. जन्माच्या सहा दिवसानंतर माझ्या आईने माझे नाव करण असावे असे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर माझे नाव बदलले गेले आणि राहुलच्या ऐवजी करण जोहर ठेवण्यात आले.

टॅग्स :वरूण धवनकरण जोहर