Join us  

करण जोहर म्हणतो, 'यापुढे नो आयटम साँग', मात्र कतरिना कैफ झाली नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 7:57 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने यापुढे आपल्या कोणत्याही सिनेमात आयटम साँग नसणार असे सांगितले आहे.

ठळक मुद्देआयटम साँग करण्याची चूक करणार नाही - करण जोहरआयटम साँगचा मी मनमुराद आनंद लुटला - कतरिना कैफ

सध्या मराठी चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट... त्यात एकतरी आयटम साँग हमखास असतेच. मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने यापुढे आपल्या कोणत्याही सिनेमात आयटम साँग नसणार असे सांगितले आहे. तर करणच्या या म्हणण्यामुळे बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ नाराज झाली आहे

यापूर्वी 'चिकनी चमेली', 'मेरा नाम मेरी है' अशा आयटम साँगची निर्मिती करणच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात आली होती. मात्र यापुढे आयटम साँग करण्याची चूक करणार नाही अशी धारणा करणने घेतली आहे. आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते, या गाण्यातून वासना दिसते. त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल अशी गाणी यापुढे माझ्या चित्रपटात दाखवणार नाही. अभिनेत्रीच्या डान्स नंबरवर माझा आक्षेप नाही मात्र ‘चिकनी चमेली’सारखे आयटम साँग यापुढे चित्रपटात दाखवण्यात येणार नाही, असे मत करण जोहरने व्यक्त केले. त्यावर कतरिना कैफने नाराज होऊन आपले मत मांडले आहे.कतरिनाने आतापर्यंत 'चिकनी चमेली', 'शिला की जवानी', 'सुरैया' असे अनेक आयटम साँग केले आहेत. कतरिना कैफ म्हणाली, 'आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते असे मला वाटत नाही. मी अनेक आयटम नंबर केलेत पण मला कधीही ते जाणवले नाही. मी या गाण्याचा मनमुराद आनंद लुटला, मला चित्रीकरण करताना खूपच मज्जा आली. मला त्यात काहीही गैर वाटले नाही.'

टॅग्स :कतरिना कैफकरण जोहर