Join us  

करण जोहर आपली संपत्ती देणार शाहरुखच्या मुलांना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2017 5:55 AM

करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात करण जोहरने सहाय्यक ...

करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याने या चित्रपटाच्यावेळी आदित्य चोप्राला असिस्ट केले होते. या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटापासूनच करण आणि शाहरुख खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. त्यानंतर करणने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खान झळकला. तसेच शाहरुख आणि करण अनेक पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळतात. तसेच एकमेकांच्या घरी कोणती पार्टी असल्यास ते आवर्जून उपस्थित राहातात.केवळ शाहरुखसोबतच नव्हे तर शाहरुखच्या कुटुंबियांसोबतदेखील करणचे खूप चांगले संबंध आहेत. शाहरुख खानची पत्नी गौरी खानदेखील करणची खूपच चांगली मैत्रीण आहे. त्याचसोबत सुहाना, आर्यन आणि अब्राहम या शाहरुखच्या मुलांसोबतही करणची ट्युनिंग खूप चांगली आहे. सुहाना आणि आर्यन या दोघांना तर तो आपल्या मुलांसारखाच मानतो.सरोगसीच्या मदतीने करणला नुकतीच दोन मुले झाली आहेत. करणनेच ही बातमी ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितली. यातील मुलाचे नाव करणने त्याचे वडिल दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरून यश तर आई हिरू जोहर यांच्या नावातील अक्षरावरून मुलीचे नाव रुही ठेवले आहे. करणला मुलं झाल्यानंतर आता त्याने त्याच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळावी यासाठी मृत्यूपत्र तयार केले असल्याचे कळतेय आणि यात त्याची सगळी संपत्ती त्याने त्याच्या मुलांसोबतच शाहरुख खानच्या सुहान आणि आर्यन या दोन्ही मुलांनादेखील देण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. करणने आपल्या मुलांसोबत शाहरुख मुलांनादेखील संपत्तीत वाट दिल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.