Join us  

करण जोहरने अतिशय खास अंदाजात यश आणि रूहीचा पहिला वाढदिवस केला साजरा, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 2:50 PM

करण जोहरची जुळी मुले यश आणि रूहीचा पहिला वाढदिवस अतिशय खास अंदाजात साजरा करण्यात आला. त्याचे काही फोटोज् आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

निर्माता करण जोहरची जुळी मुले यश आणि रूही एक वर्षाचे झाले आहेत. करणने आपल्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस खास करण्यासाठी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्याने कुठलीच कसर सोडली नसल्याचे दिसून आले. या प्रायव्हेट बॉलिवूडमधील काही मोजकेच सेलिब्रेटी उपस्थित होते. करणशी संबंधित एका सूत्राने डीएनएला सांगितले की, ‘करणने त्याच्या मित्रांशी चर्चा केली. त्यानंतर त्याने त्यांना या पार्टीचे आमंत्रण दिले. त्याने घरीच या पार्टीचे आयोजन केले होते. तैमूर अली खान, अदिरा, मीशा कपूर, लक्ष्य कपूर तसेच बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स या पार्टीला उपस्थित होते.  या पार्टीत तैमूरसह, शाहरूख खान आपला मुलगा अबरामसोबत तर अभिषेक-ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत उपस्थित होते. याव्यतिरिक्त आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, वरुण धवन, डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही पार्टीत उपस्थिती लावली होती. आलियाने यश आणि रूहीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याचबरोबर तिने यश आणि रूहीला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छाही दिल्या. आलियाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मे यू लिव टू बी अ १०३, हॅप्पी बर्थ डे माय ब्यूटीफूल सिबलिंग्स’  मनीष मल्होत्रानेदेखील सोशल मीडियावर यश आणि रूहीला अतिशय हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या. मनीषने एक फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा पुतण्या आणि पुतणीला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा’ यावेळी यश आणि रूहीचा एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला. व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दोघेही खूपच क्यूट अंदाजात बघावयास मिळत आहेत.