नवरी बनून रॅम्पवर उतरली करिना कपूूर-खान, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST
सैफ अली खानची बेगम करिना कपूर-खान नुकतीच एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक करताना दिसली. नवरीच्या अवतारात रॅम्पवर उतरलेल्या करिनाचे सौंदर्य बघण्यासारखे होते. पाहा फोटो!
नवरी बनून रॅम्पवर उतरली करिना कपूूर-खान, पाहा फोटो!
सैफ अली खानची बेगम करिना कपूर-खान नुकतीच एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक करताना दिसली. नवरीच्या अवतारात रॅम्पवर उतरलेल्या करिनाचे सौंदर्य बघण्यासारखे होते. पाहा फोटो!या फॅशन शोमध्ये करिना कपूर स्टॉपर होती. तिने रॅम्पवर एंट्री करताच अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यावेळी करिनाने फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने डिझाइन केलेला ब्रायडल आउटफिट घातला होता. या पारंपरिक वेशात करिना एखाद्या नववधूसारखी दिसत होती. लाइट पिंक कलरच्या या लहेंग्यात करिनाचे सौंदर्य चांगलेच खुलले होते. करिनाचे काही फोटोज् विक्रमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रेग्नेंसीनंतर करिना बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी करीत आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सोनमची बहीण रिया कपूर प्रोड्यूस करीत आहे.