Join us  

कपूर कुटुंब ट्रोल होताच ‘त्या’ डिनर पार्टीवर रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 4:06 PM

या लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का? अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले. इतके की, कपूर कुटुंबावर टीका होताच रणधीर कपूर यांना स्वत: खुलासा द्यावा लागला.

ठळक मुद्दे9 फेब्रुवारीला  अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते.

राजीव कपूर यांचे निधन झाले आणि पाचव्याच दिवशी कपूर कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत रणधीर कपूर यांचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि नेटकरी जणू कपूर कुटुंबावर तुटून पडलेत. राजीव कपूर यांच्या निधनाला 5 दिवसही झाले नसताना हे लोक पार्टी कसे करू शकतात?असा सवाल अनेक सोशल मीडिया युजर्सनी केला. या लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का? हे लोक इतके स्वार्थी कसे असू शकतात? अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले. इतके की, कपूर कुटुंबावर टीका होताच रणधीर कपूर यांना स्वत: खुलासा द्यावा लागला.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी या कथित पार्टीवर खुलासा केला आहे. आमच्या घरी कोणतीही बर्थ डे पार्टी झाली नाही. झाली ती फक्त एक मीटिंग. एक शोकसभा. कुठलेही सेलिब्रेशन झाले नाही. माझ्या छोट्या भावाच्या मृत्यूने मी खचलो आहे. त्याला आम्ही सगळे मिस करत आहोत. संपूर्ण कपूर कुटुंब सध्या दु:खात आहे. शोकाकूल आहे, असा खुलासा त्यांनी केला.

 15 फेब्रुवारीला बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते व करिना-करिश्माचे पापा रणधीर कपूर यांचा 74 वा वाढदिवस होता. रिपोर्टनुसार, 14  फेबु्रवारीला 12 च्या ठोक्याला रणधीर कपूर यांचा वाढदिवस साजरा केला गेला. चेंबूर येथील कपूर फॅमिलीच्या घरात रणधीर यांच्या वाढदिवसानिमित्त खास डिनर पार्टी आयोजित केली गेली. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र हे फोटो पाहताच, लोकांनी या सर्वांना  अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले.

कारण 5 दिवसांआधीच रणधीर कपूर यांचे लहान बंधू राजीव कपूर यांचे निधन झाले होते. 5 दिवसांआधी घरातील सदस्याचे निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे सेलिब्रेशन होत आहे म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली.  या पार्टीला रणबीर कपूर, त्याची गर्लफे्रन्ड आलिया भट, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, संजय कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, बबीता कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर सगळे एकत्र दिसले होते. 9 फेब्रुवारीला  अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू होते. 

टॅग्स :रणधीर कपूरराजीव कपूर