Join us  

Kantara 2: ऋषभ शेट्टीने 'कांतारा २'बद्दल दिली मोठी अपडेट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 7:41 PM

Kantara 2: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' या कन्नड चित्रपटाने जगभरात यशाची मोहोर उमटवली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ऋषभ शेट्टीने यात अभिनयही केला होता.

ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara Movie) या कन्नड चित्रपटाने जगभरात यशाची मोहोर उमटवली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ऋषभ शेट्टीने यात अभिनयही केला होता. होम्बले फिल्मच्या बॅनरखाली बनलेल्या 'कांतारा'ने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि जगभरात ४५० कोटींची कमाई केली.

१६ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 'कांतारा' या चित्रपटानं तब्बल ४५० कोटी रुपयांची कमाई करत जगभरातील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. अद्यापही या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 'कांतारा'ला मिळालेल्या उदंड यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

 'कांतारा'नं १०० दिवस पूर्ण केल्याचा आनंद चित्रपटाच्या टीमनं नुकताच साजरा केला. या प्रसंगी चित्रपटाचा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी 'कांतारा'च्या सिक्वेलबद्दल खुलासा करत म्हणाला की, 'कांतारा'वर अपार प्रेम आणि पाठिंबा देऊन हा प्रवास पुढे नेणाऱ्या प्रेक्षकांचे आम्ही खूप आभारी आहोत. सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने या चित्रपटानं यशस्वीरित्या १०० दिवस पूर्ण केले आहेत. या विशेष प्रसंगी मी 'कांतारा'च्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही पाहिलेला पार्ट २ होता. पार्ट १ पुढील वर्षी येईल. 'कांतारा' चित्रपटाचे शूटिंग करताना ही कल्पना मनात आली. कारण 'कांतारा'चा इतिहास खूप गहन आहे. तसेच, या चित्रपटाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत.