Join us

​केआरकेवर भडकली कंगना राणौतची बहीण रंगोली! बोलून गेली भलतेच काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 11:24 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या ताज्या मुलाखतीमुुळे भलतीच चर्चेत आहे. ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगना आली अन् ...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या ताज्या मुलाखतीमुुळे भलतीच चर्चेत आहे. ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगना आली अन् अचानक चर्चेत आली. हृतिक रोशन ते आदित्य पांचोली या सगळ्यांवर तिने बेधडक आरोप केलेत. आता या वादात केआरके अर्थात कमाल आर खान याने उडी घेतली आहे. केआरके twitterवर कंगनाला लक्ष्य केले. मग काय, केआरकेच्या या tweetनंतर काही क्षणात कंगनाची बहीण रंगोली हिने मैदानात उडी घेतली. तिने केआरकेला चांगलेच आडव्या हाताने घेतले. ती केवळ इथेच थांबली नाही तर तिने केआरकेला  चांगलीच शिव्यांची लाखोली  वाहिली.खरे तर या वादाची सुरुवात आदित्य पांचोलीच्या पत्नीच्या एका मुलाखतीनंतर झाली. कंगना आणि आदित्य साडे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा आदित्यची पत्नी जरीना हिने केला. यावर रंगोलीने जरीनाला चांगलेच सुनावले. ‘कंगना २००५ मध्ये आदित्यला भेटली होती आणि २००७ मध्ये तिने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मग दोघेही चार वर्षे एकमेकांना डेट कसे करू शकतात जरीनाजी’,असे रंगोलीने लिहिले. यानंतर पुढच्या  tweetमध्ये तिने जरीनाला आणखीच सुनवले. ‘तुमची मुलगी सना पांचोली हिचा जन्म १९८५ मध्ये झाला तर कंगनाचा १९८७ मध्ये. तुम्हीही या शोषणात सहभागी आहात तर तुम्हाला लाज वाटायला हवी,’ असे रंगोलीने लिहिले.ALSO READ : ​कंगना राणौतच्या आरोपांवर का शांत आहे हृतिक रोशन ?रंगोलीच्या या  tweetला केआरकेने उत्तर दिले. ‘कंगना २००५ मध्ये भेटली आणि तिचा चित्रपट एप्रिल २००६ मध्ये रिलीज झाला? माझ्याजवळ पाच साक्षीदार आहेत की, तुझी बहीण कंगना आदित्यला २००३ मध्ये भेटली होती,’ असे tweet केआरकेने केले. या  tweetवर रंगोली चांगलीच भडकली. ‘आण पुरावा, मी तुला चॅलेंज करते. कंगना-आदित्य २००३ मध्ये भेटल्याचा पुरावा दे नाही तर सगळ्यांपुढे नाक रगड विकाऊ कुत्र्या,’ असे रंगोली बोलून गेली.