Join us  

कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेलचा महेश भट, फोर्ब्सवर निशाणा; ट्वीट वाचून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 1:16 PM

वादग्रस्त ट्वीट करत सतत चर्चेत राहणारी कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल पुन्हा एकदा चर्चेत आहे.

ठळक मुद्देफोर्ब्स इंडियाने नुकतीच सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली.

वादग्रस्त ट्वीट करत सतत चर्चेत राहणारी कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल पुन्हा एकदा चर्चेत आहे. रंगोलीने केलेल्या दोन ट्वीटची सध्या जाम चर्चा रंगलीय.पहिल्या ट्वीटमध्ये रंगोलीने निर्माता व दिग्दर्शक महेश भट यांना लक्ष्य केले. तर दुस-या ट्वीटमध्ये फोर्ब्स यादीवर निशाणा साधला.

म्हणे, तुमचे हे ढोंगी स्वतंत्र्य आता चालणार नाही

 

महेश भट यांनी नुकतेच एक ट्वीट करत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या याच ट्विटच्या पार्श्वभूमीवर रंगोलीने त्यांच्यावर निशाणा साधला.  महेश भट यांचा काही वर्षांपूर्वीचा मुलीसोबतचा लिपलॉक किस करतानाचा एक फोटो पोस्ट करत तिने महेश भट यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.‘भट साहेब, पुस्तक वाचून आपण फक्त मोठ्या गोष्टी बोलू शकतो. मोठं होऊ शकत नाही. तरुण मुलीला मांडीवर बसवून तिच्यासोबत फोटो काढता. व्यक्ती त्याच्या कर्माने मोठी होते. तुम्ही देशासाठी काय केले? तुमचं हे ढोंगी स्वातंत्र्य आता चालणार नाही.’ असे ट्विट तिने केले.'  या ट्विटसोबत रंगोलीने महेश भट आणि पूजा भट यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात हे दोघंही लिपलॉक किस करताना दिसत आहेत. या फोटोवरुन या आधीही बरेच वाद झाले आहेत.  

 फोर्ब्स इंडिया एक नंबरचा फ्रॉड

फोर्ब्स इंडियाने नुकतीच सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीवरूनही रंगोली उखडली. ही यादी म्हणजे, एक नंबरचा फ्रॉड आहे, असे तिने ट्विटरवर लिहिले. केवळ इतकेच नाही तर उत्पन्न सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान तिने दिले.

‘हे फोर्ब्स इंडिया एक नंबर फ्रॉड आहे. मी जाहीरपणे त्यांना एका तरी सेलिब्रिटीचे यादीत दिलेले उत्पन्न सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देते. सगळा पीआरचा खेळ आहे. या यादीतील कंगनाच्या उत्पन्नाच्या आकड्यापेक्षा अधिक ती टॅक्स भरते. कुणी किती टॅक्स भरला, ते यांनी सांगावे. तुम्ही कोणत्या आधारावर लोकांच्या कमाईचा अंदाज बांधता? खुद्द कंगनालाही तिने यावर्षी किती पैसे कमावले हे ठाऊक नाही. केवळ तिचे अकाऊंट डिपार्टमेंट आणि मला याबद्दल ठाऊक आहे. सेलिब्रिटींच्या उत्पन्नाचे आकडे गोपनीय ठेवले जातात आणि यांच्याजवळ म्हणे, संपूर्ण इंडस्ट्रीचे अकाऊंट आहे, ’ असे तिने लिहिले.

टॅग्स :कंगना राणौतरांगोळीमहेश भटफोर्ब्सनागरिकत्व सुधारणा विधेयक