Join us  

'जादूटोणा करायची आणि वस्तू स्मशानात फेकायला सांगायची', अभिनेत्याने कंगनावर केला होता गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:46 PM

कंगणा राणोत तिच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे. यापैकी एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे. यापैकी एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

कंगणा राणौत आणि शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन यांच्या अफेअर एकेकाळी जगजाहीर होते. वयाने 20 वर्षाने मोठा असलेला आदित्य पंचोलीसह ब्रेकअप झाल्यानंतर कंगणा अध्ययन सुमनच्या प्रेमात पडली. मात्र अध्ययनचे वडिल शेखर सुमनला मात्र कंगणासह अध्ययनच्या नात्याला विरोध होता.इतकेच नाहीतर सुमन कुटुंबाने कंगणाने त्यांच्या कुटुंबावर जादु टोणा केल्याचेही आरोप लावले होते. अनेक विरोधानंतर अध्ययन आणि कंगणाच्या नात्यात दुरावा निर्माण होते दोघांचेही नाते संपुष्ठात आले होते.

कंगणा राणौतने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, शिवीगाळ केली होती आणि इतकंच नाही तर सँडल फेकून मारली होती असा आरोप अध्ययन सुमनने केला होता. हा सगळा प्रकार 2016 साली हृतिक रोशनने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीहून परतताना घडल्याचा आरोप अध्ययने केला होता. त्यावेळी कारमध्ये कंगणाने कारमध्ये असभ्य वर्तन करत मारहाण केल्याचंही अध्ययने म्हटले होते. 

शिवाय जबरदस्तीने घरी सोडायला सांगितले होते. मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता. अध्ययने कंगणासह 'राज-2' या सिनेमात काम केले होते. या दोघांचं अफेअरही होते मात्र लगेचच दोघांचं ब्रेकअपही झालं.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करूनही अध्ययनला यश मिळाले नाही. अध्ययन चित्रपटसृष्टीत येऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. पण तरीही त्याला बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करता आली नाहीये. अध्ययन त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.

टॅग्स :कंगना राणौतअध्ययन सुमन