Join us  

Kangana Ranaut's Twitter Account : अखेरीस कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 12:59 PM

ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे तिच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या दाखवण्यात येत आहे. 

कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती देशातील अनेक सामाजिक प्रश्नांवर ट्विटरद्वारे भाष्य करत असते. तिचे ट्वीट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. तसेच तिला आजवर सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण आता ट्विटरकडून तिचे ट्विटर अकाऊंटच बंद करण्यात आले आहे.

ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे तिच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या दाखवण्यात येत आहे. 

कंगनाने पश्मिच बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्याबाबत एक ट्वीट केले होते. या वादग्रस्त ट्वीटमुळे तिच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केली जावी अशी मागणी नेटिझन्सने सोशल मीडियावर केली होती.   

टॅग्स :कंगना राणौत