Join us  

मुस्लिम व्यक्तिवर प्रेम असल्याने हृतिक रोशनच्या बहिणीला कुटुंबीयांकडून मारहाण! कंगनाच्या बहीणीचा शॉकिंग खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:16 PM

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच्याबद्दल.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून हृतिकची बहीण सुनैना कायम चर्चेत आहेत. कधी ती डिप्रेशनमध्ये असल्याच्या बातम्या येतात तर कधी तिच्या कुटुंबासोबत असलेल्या भांडणाच्या. अर्थात रोशन कुटुंबाने अद्याप यावर काहीही खुलासा केलेला नाही

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनकंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाच्या बाजूने कायम मैदान लढवणारी तिची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच्याबद्दल. रोशन कुटुंब सुनैनाचा शारीरीक छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. रंगोलीने सुनैनासंदर्भात एकापाठोपाठ एक असे अनेक  ट्वीट  करत, अनेक दावे केले आहेत. सुनैनाने कंगनाला फोन करून मदतीची विनंती केली, असा दावाही रंगोलीने या  ट्वीट मध्ये केला आहे.

 

सुनैना दिल्लीच्या एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम करते. त्यामुळे रोशन कुटुंबाने सुनैनाचा छळ चालवला आहे. गत आठवड्यात एका महिला पोलिसाने सुनैनावर हात उचलला. तिच्या वडिलांनीही तिला मारहाण केली आणि भावाने सुनैलाला घरात डांबून ठेवण्याचे प्रयत्न केलेत, असे एका  ट्वीट मध्ये रंगोलीने म्हटले.

अन्य एका  ट्वीट मध्ये रंगोलीने सुनैनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रोशन कुटुंबाकडून सुनैनाला धोका आहे, असे मला वाटते. मी हे पब्लिक केले कारण सुनैना कंगनाला फोन करून सतत रडत असते. पण तिची कशी मदत करावी, हे कंगनाला समजत नाही. आता कंगनाने तिचा नंबर ब्लॉक केला आहे. पण सुनैनाबद्दल कंगना चिंतीत आहे. सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. हे सगळे पब्लिक झाल्यानंतर रोशन कुटुंब या प्रेमाला असलेला विरोध मागे घेईल, अशी आशा आहे, असेही रंगोलीने म्हटले आहे.

रंगोलीचे हे टिष्ट्वट वाचून एका युजरने तिला उलट प्रश्न केला. सुनैना स्वत: पोलिसांना फोन करून मदत मागू शकते, ती कंगनाला कॉल का करतेय? असे त्याने विचारले. यावरही रंगोलीने उत्तर दिले. होय, मी सहमत आहे. पण कंगनाला सुनैनाच्या सततच्या कॉलमुळे चिंतीत होती. रोशन कुटुंब कंगनालाही नुकसान पोहोचवू शकते. पण यावेळी मी सावध आहे. मी सुनैनाशी बोलले आहे. तिचे सगळे मॅसेज आणि रेकॉर्डिंग मी जपून ठेवले आहे. सुनैना अडचणीत आहे आणि कंगनाला मदत मागते आहे. रोशन कुटुंब कंगनाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे मी सुनैनाच्या बाजूने हे सगळे करतेय. सुनैनाच्या विनंतीवरूनच मी ही गोष्ट जगासमोर ठेवली आहे, असे रंगोलीने म्हटले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून हृतिकची बहीण सुनैना कायम चर्चेत आहेत. कधी ती डिप्रेशनमध्ये असल्याच्या बातम्या येतात तर कधी तिच्या कुटुंबासोबत असलेल्या भांडणाच्या. अर्थात रोशन कुटुंबाने अद्याप यावर काहीही खुलासा केलेला नाही. सुनैना एका मानसिक आजाराने आजारी असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र खुद्द सुनैनाने या बातम्या अफवा असल्याचे म्हटले होते. मी कुठल्याही आजाराने पीडित नाही, असे तिने म्हटले होते. शिवाय कुटुंबाकडून सपोर्ट मिळत नसल्याचा खुलासाही केला होता.

सुनैनाचा कंगनाचा पाठींबा?

 

एकीकडे हृतिक व कंगनाचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे हृतिकची बहीण सुनैनाने कंगनाला पाठींबा दिला आहे. मी प्रत्येक स्थितीत कंगनाला पाठींबा दिला, असे ट्वीट  सुनैनाने केले आहे. यानंतर सुनैनाने आणखी एक  ट्वीट  केले. ‘आणि यामुळे मी नरकात जगत आहे. मी या सगळ्या गोष्टींना त्रासली आहे,’ असे तिने म्हटले.

टॅग्स :हृतिक रोशनकंगना राणौत