Join us

​कंगना राणौत होणार मावशी; बहीण रंगोली होणार आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 10:14 IST

अभिनेत्री कंगना राणौत सध्या जाम आनंदात आहे. तिच्या आनंदाचे कारणही तेवढेच खास आहे. होय, कंगना लवकरच आपल्या रिअल लाईफमध्ये ...

अभिनेत्री कंगना राणौत सध्या जाम आनंदात आहे. तिच्या आनंदाचे कारणही तेवढेच खास आहे. होय, कंगना लवकरच आपल्या रिअल लाईफमध्ये एका नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे. अर्थात कंगना लवकरच मावशी बनणार आहे. कंगनाची बहीण रंगोली प्रेग्नंट असल्याची खबर आहे. या वर्षाच्या अखेरिस रंगोली आई होणार आहे. रंगोली व कंगना या दोघी बहिणी एकमेकींच्या अतिशय क्लोज आहेत. त्यामुळे रंगोली आई होणार या बातमीने कंगनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कंगनाने स्वत: मीडियासमक्ष या बातमीला दुजोरा दिला. प्रियांका चोप्राच्या पार्टीत पोहोचली तेव्हा तिने ही गोड बातमी सगळ्यांशी शेअर केली होती. हे बाळ आमच्या कुटुंबातील पहिले ग्रँडचाइल्ड असणार आहे. त्यामुळे माझ्यासकट माझे अख्खे कुटुंब आम्ही सगळेच अतिशय आनंदात आहोत. तूर्तास रंगोलीला बेड रेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे, असे कंगनाने यावेळी सांगितले.ALSO READ : ​वाढदिवशी कंगना राणौतने स्वत:ला दिली ‘ही’ सुंदर भेट!यापूर्वी रंगोलीचा गर्भपात झाला होता. कदाचित त्याचमुळे यावेळी डॉक्टरांनी तिला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रंगोली आपल्या घरगुती कामांशिवाय कंगनाच्या प्रोफेशनल गोष्टी सांभाळते. रंगोलीला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने कंगनाने स्वत:साठी एक टीम हायर केली आहे. ही टीम कंगनाची प्रोफेशनल लाईफ सांभाळेल. कंगनाने या वृत्तालाही दुजोरा दिला. होय, मी नवी टीम हायर केली आहे. यात काहीही वावगे नाही. हे सगळे आयुष्याचा भाग आहे. रंगोलीचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे,असे ती म्हणाली.रंगोलीने सन २०११ मध्ये दिल्लीचा बिझनेसमॅन अजय चंदेल याच्यासोबत लग्न केले होते. कंगनाने स्वत: रंगोलीच्या लग्नाची जबाबदारी सांभाळली होती. कपड्यांपासून तर लग्नमंडपाच्या सजावटीपर्यंत सगळे काही कंगनाने केले होते.