Join us  

दिल्लीतील हिंसेबाबत धडाधड ट्विट करून भडकली कंगना रणौत, दिलजीत-प्रियांकाचं केलं अभिनंदन...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:08 PM

खासकरून ती शेतकरी आंदोलनकर्त्यांवर भडकली आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या लोकांना दहशतवादी म्हटलंय. चला बघुया कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलंय.

अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा दिल्लीतील आंदोलनावरून भडकली आहे. तिने रागात दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा आणि आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधला आहे. एकापाठी एक ट्विट करून तिने आपला संताप व्यक्त केलाय. खासकरून ती शेतकरी आंदोलनकर्त्यांवर भडकली आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या लोकांना दहशतवादी म्हटलंय. चला बघुया कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलंय.

CAA आंदोलनकर्त्यांसोबत शेतकऱ्यांशी तुलना

कंगनाने काही तासांपूर्वीच एक ट्विट केलंय. यात तिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तिने शेतकरी आंदोलनकर्त्यांची तुलना सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्यांसोबत केली आहे. फोटोवर लिहिले आहे की, यांच्यात काहीच फरक नाही. सोबतच कंगना पोस्टमध्ये लिहिले की, 'संदेश स्पष्ट आहे की, देशात कोणताही चांगला बदल होऊ दिला जाणार नाही. दहशतवाद आपल्या देशाचं भविष्य ठरवणार सरकार नाही'.

याआधी कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिने शेतकरी आंदोलनकर्त्यांबाबत आपलं मत मांडलं होतं. तिने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले होते की, 'जवळपास प्रत्येक महिन्यात दिल्ली, बंगळुरू आणि आता पुन्हा दिल्लीमध्ये दंगे आणि खूनखराबा होत आहे. याने मी थकले आहे. #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ #RedFort'.

दिलजीत आणि प्रियांकावर साधला निशाणा

आपल्या एका दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रावर भडकली आहे. ती दोघांनाही प्रश्न विचारत म्हणाली की, 'दिलजीत आणि प्रियांका यावर तुम्ही उत्तर द्या. संपूर्ण जग आपल्यावर हसत आहे. हेच हवं होतं ना तुम्हा लोकांना...अभिनंदन'. 

शेतकऱ्यांवर भडकली कंगना

एका दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने अर्वाच्च भाषा वापरत लिहिले की, 'अशिक्षित, अडानी गल्ल्यांमध्ये कुणाच्या घरी लग्न होत असेल, काही चांगला उत्सव असेल तर त्यांवर जळणारे काका/काकी कपडे धुने किंवा लहान मुलांना अंगणात शौचास बसवणे किंवा खाटेवर अंगणात दारू पिऊन नग्न होऊन झोपणे, हीच परिस्थिती झाली आहे या देशाची. जरा तरी लाज बाळगा'.

कंगनाच्या हातून गेलं काम

कंगनाने प्रजासत्ताक दिनाला एक ट्विट केलं. ज्यात तिने लिहिले की, 'सहा ब्रॅन्ड्सनी माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. काहींवर आधीच साइन केले होते, काहींवर करणार होते. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, त्यामुळे ते मला त्यांची ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. आज मी या दंग्यांना समर्थन करत असलेल्या अ‍ॅंटी नॅशनल ब्रॅन्ड्सना दहशतवादी म्हणेन'.

टॅग्स :कंगना राणौतदिल्लीशेतकरी संपदिल्लीदिलजीत दोसांझप्रियंका चोप्रा