Join us  

कोरोनातून बरं होण्याचे सिक्रेट कोणालाच नाही सांगणार, कंगना राणौतची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 2:02 PM

तुमच्या सगळ्याचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कशारितीन हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही.

कंगणा राणौतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण तिने आता कोरोनावर मात केली असून  ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली आहे.  सोशल मीडियावर कोरोनामुक्त झालेल्या कंगणाने खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत म्हणाली, तुमच्या सगळ्याचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कशारितीन हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही म्हणत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.  जर आपण विषाणूबद्दल काही अनादर दाखवला तर काही लोक खरोखरच दुखावले जातात. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. "

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तेव्हा तिने कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे, मला कल्पना नव्हती की या विषाणूने माझ्या शरीरात शिरकाव केला आहे. मला माहिती आहे की विषाणूला मी हरवेन. असा विश्वासच त्यावेळी तिने व्यक्त केला होता.

कृपया तुमच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देवू नका. ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड -19 ला नष्ट करूया .हर हर महादेव.

कंगणाचे ट्विटर अकाऊंच बंद झाल्यानंतर आता तिने इस्टाग्रामचा आधार घेतला आहे. कंगणा आता इन्स्टाग्रामवर आपले विचार मांडत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे कंगना राणौत तिच्या बिनधास्त वक्त्तव्यासाछी ओळखली जाते. आपल्या वक्तव्यांमुळे ती कायम सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर असते. अलीकडेच कंगनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धासारख्या परिस्थितीवर आपले मत दिले होते. मात्र त्यानंतर नेटक-यांनी तिला इस्राइलबद्दल काहीच माहिती नाही, असे म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली. पण शांत बसेल ती कंगना नाही. आता तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ (इस्राइयलबद्दलचा) शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते.

टॅग्स :कंगना राणौतकोरोना सकारात्मक बातम्या