Join us  

​ कंगना राणौतने अचानक घेतला मोठा निर्णय! हृतिक रोशनलाही बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 5:45 AM

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’चा एक गाजलेला अध्याय तुम्ही आम्ही जाणतोच. प्रत्येक मुलाखतीत ...

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’चा एक गाजलेला अध्याय तुम्ही आम्ही जाणतोच. प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असली नसली सगळी भडास तिने बाहेर काढली आहे. पण आता हृतिक व कंगनाच्या चाहत्यांना धक्का बसेल अशी बातमी आहे. होय, कंगना व हृतिकच्या कहाणीत एक वेगळेच वळण बघायला मिळत आहे. खबर खरी मानाल तर कंगनाने हृतिकची एक्स मॅनेजर अंजली आथा हिला हायर केले आहे.हृतिकने बॉलिवूडमध्ये आपले करिअर सुरु केले तेव्हा त्याचे सर्व प्रोजेक्ट अंजली (एक्सीड एंटरटेनमेंट) बघायची. पण कालांतराने हृतिक व एक्सीडमध्ये वाजले. कंपनी आपल्या नावावर ग्राहकांकडून किती पैसा घेते, हे हृतिकला जाणून घ्यायचे होते. पण कंपनीने यास नकार दिला आणि हृतिकने एक्सीडसोबतचे १२ वर्षांचे नाते संपवले. अंजली याच कंपनीची भाग होती. पण पुढे हृतिक व एक्सीडसोबत मतभेद झाले आणि अंजलीही बाहेर पडली. गेल्या सात महिन्यांपासून तिच्याकडे कुठलेही काम नव्हते. पण आता अंजली कंगनासाठी काम करणार आहे. खुद्द अंजलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंगनाने माझ्यावर विश्वास दाखवला, हे बघून मी अतिशय आनंदात आहे. इतके महिने घरी बसणे सोपे नसते, असे अंजली म्हणाली.ALSO READ : ​कंगना राणौतला भासू लागली जोडीदाराची उणीव! पुढीवर्षी फेब्रुवारीत वाजणार सनई चौघडे!!आता अंजली कंगनाच्या कंपूत गेली म्हटल्यावर भविष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज तुम्ही बांधू शकता. अंजलीने दीर्घकाळ हृतिकसोबत काम केले आहे. साहजिकच हृतिकची काही सीक्रेटही अंजली जाणून असणार. अर्थात अंजली प्रचंड प्रोफेशनल आहे आणि तिचा रेकॉर्डही शानदार राहिला आहे. अंजलीचे मानाल तर तिने आधीच हृतिक प्रकरणासंदर्भात मी तुझी कुठलीही मदत करणार नाही, हे कंगनाला स्पष्टपणे सांगून टाकले आहे. पण तरिही हृतिक व कंगनाचे हे ‘कनेक्शन’ येत्या काळात काय रंग दाखवते, ते बघूच.