Join us  

बंदा इतना अंधा भी....! कंगना राणौतवर भडकला दिलजीत दोसांज

By रूपाली मुधोळकर | Published: December 03, 2020 12:19 PM

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि तोंडघशी पडली.

ठळक मुद्देकंगनाने भलेही  ट्वीट डिलीट केले. पण म्हणून टीका कमी झाली नाही. महिंदर कौर यांनीही कंगनाला खरपूस शब्दांत उत्तर दिले.

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या  एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे  ट्वीट तिने केले आणि  काही  वेळात तिने हे  ट्वीट डिलीटही केले. पण तोपर्यंत या  ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली.आता सिंगर व अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनाच्या या  ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.दिलजीतने संबंधित शेतकरी महिलेचा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाला चांगलेच सुनावले. ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’असे या पोस्टसोबत दिलजीतने लिहिले.

 काय होते कंगनाचे ट्विट?शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या 87 वर्षांच्या आहेत. याच आजीची तुलना  कंगनाने  शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादीसोबत केली होती. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे,’ असे  ट्वीट कंगनाने केले होते. यानंतर सोशल मीडियावरून कंगानाचा विरोध होऊ लागला होता. ट्रोल होताच कंगनाने हे  ट्वीट डिलीट केले होते.

आजीनेही दिले उत्तरकंगनाने भलेही  ट्वीट डिलीट केले. पण म्हणून टीका कमी झाली नाही. महिंदर कौर यांनीही कंगनाला खरपूस शब्दांत उत्तर दिले. ‘माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे  तुझ्याकडे (कंगना) काम नसेल तर तुच माझ्या शेतात मजुरीला ये,’ अशा शब्दांत या आजीने कंगनाला सुनावले.

'काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये', 'त्या' पंजाबी आजीने कंगनाला सुनावले खडे बोल!

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली 

टॅग्स :कंगना राणौतदिलजीत दोसांझ