Join us  

आता मला तू माझ्या आयुष्यात नकोय...! कंगनानं बहिण रंगोलीला सुनावलं, वाचा पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:27 AM

कंगनाने चक्क लाडक्या बहिणीला दिली अनफॉलो करण्याची धमकी, वाचा काय आहे कारण?

ठळक मुद्देरंगोली ही कंगनाची बहिण आहे. कंगनाचं सगळं काम रंगोली सांभाळते. अगदी कंगानाची सावली बनून ती वावरते.

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत (Kangana Ranaut ) सध्या चर्चेत आहे ती ‘थलायवी’ या सिनेमामुळे. याशिवाय अन्य एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. ते म्हणजे रंगोली.  होय, कंगनाची लाडकी बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel). लोक कंगनाला जितकं ओळखतात, तितकंच रंगोलीलाही ओळखतात. याचं कारण म्हणजे, कंगनावरचा प्रत्येक वार आधी रंगोली झेलते. कंगनावर टीका झाली रे झाली की, रंगोली जणू सर्व शस्त्र पाजळून मैदानात उतरते. याच रंगोलीला अनफॉलो करण्याची धमकी कंगनाने दिली आहे. आश्चर्य वाटले ना? आता ही काय भानगड आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.

तर नुकतीच कंगना आरजे रौनकच्या ‘13 जवाब नहीं’ या शोमध्ये पोहोचली. यावेळी आरजे रौनकच्या अनेक प्रश्नांना कंगनाने नेहमीप्रमाणे बेधडक उत्तरं दिलीत. एखाद्याला अनफॉलो करायचा पर्याय दिला तर कोणाला करशील? असा प्रश्न आरजे रौनकने कंगनाला केला.  यावर ‘मला असा काही पर्याय दिलाच तर मी रंगोलीला अनफॉलो करेल,’ असं कंगना हसत हसत म्हणाली.   इतकं बोलून ती थांबली नाही तर आरजे रौनकचं चॅलेंज स्वीकारत तिनं थेट शोमधूनच रंगोलीला कॉल लावला.

चॅलेंज काय तर, मला आता तू माझ्या आयुष्यात नकोय, हे रंगोलीला स्पष्ट स्पष्ट सांगायचं. रंगोलीला कॉल लावला गेला आणि कंगना कॉलवरही तेच बोलली. ‘मला आता तू माझ्या आयुष्यात नकोय,’ हेच वाक्य तिनं रंगोलीला ऐकवलं. पण रंगोली शेवटी कंगनाचीच बहीण. तिनं यावर काय उत्तर द्यावं? ‘तरिही मी तुझ्यासोबतचं राहिलं,’असं रंगोली म्हणाली. रंगोलीचं हे उत्तर ऐकून कंगनाचा ऊर अभिमानानं भरून आला नसेल तर नवल. मग काय, तिनं रंगोलीचं मनापासून कौतुक केलं. ही आहे माझी बहीण, असं ती अभिमानानं म्हणाली.रंगोली ही कंगनाची बहिण आहे. कंगनाचं सगळं काम रंगोली सांभाळते. अगदी कंगानाची सावली बनून ती वावरते.

टॅग्स :कंगना राणौत